नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची गुजरातमध्ये विक्री टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची गुजरातमध्ये विक्री

गुजरातच्या दोन युवकांसह तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात एका महिलेचाही समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागपुर : क्राईम कॅपिटल नागपुरात (Nagpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून गुजरात (Gujrat) मध्ये विक्री करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुजरातच्या दोन युवकांसह तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात एका महिलेचाही समावेश आहे.

विशाखा प्रदीप बिस्वास (वय ३५), निखिल गिरीशभाई पटेल (वय ३५) आणि प्रकाश मेघाभाई वनकर (वय ३०), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिडीत विद्यार्थीनी ही शिक्षण घेत असून तिची मैत्रीण ही आरोपी विशाखाला ओळखते. डिसेंबरमध्ये पिडीत विद्यार्थीनी ही आरोपी विशाखाला भेटली आणि तीने पिडीत विद्यार्थीनीला गुजरातमध्ये एका कापडाच्या दुकानात नोकरी लावून देणार असल्याचे सांगितले. आरोपी विद्यार्थीनीला घेऊन गुजरातला गेली आणि त्यानंतर आरोपी निखिल याच्या माध्यमातून विशाखाने आरोपी प्रकाशला एक लाख रुपयांमध्ये विद्यार्थीनीची विक्री केली त्यानंतर प्रकाशने पिडीत मुलीशी लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

या दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने पिडीत मुलीच्या कुटुंबाने एमआयडीसी (MIDC) पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकणाचा तपास सुरू होता. त्यात आरोपी विशाखाला पोलीसांनी ताब्यात घेतले. विशाखाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपी निखिल आणि प्रकाशला अटक केली आणि पिडीत मुलीची सुटका करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात भाजपने दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलं तिकीट, निष्ठावंत नाराज; बंडखोरीची शक्यता

New Year 2026 : आपण कुठे चाललो आहोत?

New Year पार्टीनंतर डोकेदुखी अन् थकवा दूर करण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Zepto IPO : झेप्टोचा मोठा प्लॅन! स्विगी आणि झोमॅटोच्या पावलावर पाऊल टाकणार झेप्टो; 11,000 कोटींचा IPO येणार?

TV सुद्धा होऊ शकतो हॅक! 'ही' 5 लक्षणे दिसताच व्हा सावध; नाहीतर संपूर्ण घरावर कॅमेऱ्यातून राहील हॅकरची नजर

SCROLL FOR NEXT