Aadesh Bandekar esakal
महाराष्ट्र बातम्या

Aadesh Bandekar: आदेश बांदेकर अडचणीत, अर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप; काय आहे प्रकरण?

ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. सिद्धिविनायक मंदीर प्रकरणी अर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आले आहेत. मात्र, बांदकेर यांनी हे आरोप फेटाळले आहेत. (Aadesh Bandekar Siddhivinayak Mandir Accused of financial embezzlement )

मागच्या काही दिवसांपूर्वी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सिद्धीविनायक मंदीरात घोटाळा झाल्याचा आरोप आदेश बांदेकर यांच्यावर केला होता. दरम्यान आता पुन्हा त्यांच्यावर मनसे नेते मनोज चव्हाण यांनी आरोप केला आहे.

सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढते असते परंतु यावर्षी ती निघाली नाही त्याला आदेश बांदेकर जबाबदार असल्याचे मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी आरोप केला आहे. या डायरीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा असा बांदेकर यांचा अट्टाहास असल्याची माहिती आहे. याला काही विश्वस्तांचा विरोध असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

आदेश बांदेकर काय म्हणाले?

गेल्या दोन वर्षात कोरोना काळामुळे ही डायरी छापली गेली नाही. अर्थिक खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी डायरी छापण्यात आली नाही अशी माहितीही बांदेकर यांनी यावेळी दिली. तसेच, मनसेचे हे आरोप राजकीय हेतून आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही. असही बांदेकर यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT