आदित्य ठाकरे google
महाराष्ट्र बातम्या

कोकणातील रिफायनरीबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

'कोकणातील रिफायनरीमुळे पर्यावरणाला हानी पोचणार नाही याची काळजी घेऊ'

सकाळ डिजिटल टीम

'कोकणातील रिफायनरीमुळे पर्यावरणाला हानी पोचणार नाही याची काळजी घेऊ'

कोकणतील रिफायनरीसाठी स्थानिकांशी चर्चा करून त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत (Uddhav Thackeray) पोहचवणार आहे. चांगला प्रकल्प येत असेल तर त्याचं स्वागत आहे. यासाठी लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाणार आहे. यासाठी दोन्ही शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे. रिफायनरी संदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आज ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, कोकणात रिफायनरीमुळे (Konkan Refinery) पर्यावरणाला हानी पोचणार नाही याची काळजी घेत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. चांगला प्रकल्प येत असेल तर लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाणार आहोत. रिफायनरीसाठी दोन्ही शिष्टमंडळाशी चर्चा करून यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आम्ही विचार सुरु आहे. कोकणतील पर्यटनाला वाव आहे मात्र ते आणखीन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नाराजीबाबत ते म्हणाले, जिथे दोन पक्ष एकाच ठिकाणी लढतात तिथे अशा प्रकारे खदखद निर्माण होत असते. आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही सगळे एकत्र येऊन काम करत आहोत. आघाडीतील नेते एकत्र बसून नाराजी दूर करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आमदार तानाजी सावंत यांच मतं हे वैयक्तिक असु शकतं. प्रत्येक मतदार संघाला न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. आघाडीतील वरिष्ठ नेते इतर नाराज नेत्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT