आदित्य ठाकरे इ-सकाळ
महाराष्ट्र बातम्या

रत्नागिरी - मंत्री आदित्य ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील गाडीला अपघात

ताफ्यातील दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकून हा अपघात झाला.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे पर्यावरण मंत्री मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते रत्नागिरीकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरीतील (Ratnagiri) खारेपाटण इथं त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून आदित्य ठाकरेही (Aditya Thackeray) सुखरूप असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या अपघातात आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील मधील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. मुंबई-गोवा (Mumbai Goa Highway) हायवेवरील खारेपाटण चेक पोस्टजवळ ही दुपारी आज सुमारे बाराच्या दरम्यान घडली आहे. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीकडे जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी सुमारास हा अपघात झाला. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे या गाड्या असताना, एका गाडीने ब्रेक मारला असता. ताफ्यातील दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकल्या. या अपघातात कोणी जखमी झाले नसून वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, कालपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर (Konkan Tour) आहेत. रिफायनरी, पर्यटन अशा अनेक मुद्द्यावरून विकासाच्या दृष्टीने बदल करण्याच्या हेतून हा दौरा असल्याचे सांगितले आहे. नियोजित दौऱ्याप्रमाणे आज सकाळी ते सिंधुदुर्गवरून रत्नागिरीकडे जात असताना खारेपाटण येथे त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसुन सर्व सुखरुप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

SCROLL FOR NEXT