आदित्य ठाकरे esakal
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा रणधुमाळी; उद्यापासून २ दिवस आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर

शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवस गोवा दौऱ्यावर जाणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. जशा निवडणूका जवळ येत आहेत तसा या राज्यांतील राजकीय वातावरणाला रंग चढला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर टीका सुरु आहे. दरम्यान, गोव्यातील (Goa Election 2022) विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता येथे नेतेमंडळींचे दौरे सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मिलक यांच्यानंतर आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) गोवा दौऱ्यावर जाणार आहेत.

शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवस गोवा दौऱ्यावर जाणार आहेत. ११ आणि १२ फेब्रुवारीला आदित्य ठाकरे गोव्यात (Goa) असणार आहेत. गोव्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसात वास्को, साखळी आणि पेडणे येथे प्रत्येकी एक अश्या तीन सभा ते घेणार आहेत. याशिवाय म्हापसा बाजारपेठेत घरोघरी जाऊन आदित्य ठाकरे शिवसेनेसाठी प्रचार करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सीमोल्लंघनाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्राबाहेरील (Maharashtra) शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणारे पहिले ठाकरे ठरले आहेत. आता या दौऱ्यात आदित्य ठाकरे कोणते निर्णय घेणार आणि आश्वासने देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हेही गोव्यात प्रचारसाठी जाणार आहेत. उद्या ते जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी कुणाला बहुमत मिळणार नसून गोव्यात (Goa Election 2022) सर्व पक्षांना एकत्र यावे लागेल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT