mla abdul sattar on daughters name in tet exam scam in maharashtra  esakal
महाराष्ट्र बातम्या

महत्त्वाचं खातं मिळाल्यानंतर सत्तार म्हणतात, मागणी न करताच...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले अब्दुल सत्तार यांना पहिल्याच टप्प्यात मंत्रीमंडळात स्थान मिळालं आहे. त्यातच आज मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली असून नव्या सरकारमध्ये एकप्रकारे त्यांचं प्रमोशन झालं आहे. आधीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले सत्तार आता कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे कृषी खात्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.(Abdul Sattar news in Marathi)

अब्दुल सत्तार म्हणाले की, माझं प्रमोशन झालं आहे. कृषीप्रधान महाराष्ट्र राज्याची कृषी विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे. कृषीमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी आभार मानतो. दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पडेन. कृषी विभागात अनमोल असे बदल करून शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी विशेष योजना केंद्र आणि राज्यसरकारच्या मदतीने राबवणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं.

मी कोणतीही मागणी न करता मला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मागील ४२ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली. कृषी खातं माझा आवडता विषय आहे. आपण शेतकरीप्रश्नी वारंवार लढा दिल्याचं सत्तार यांन म्हटलं.

बोगस शिक्षक भरतीप्रकरणी सत्तार यांच्या कुटुंबीयांवर आरोप झाले होते. सत्तार यांच्या आपत्यांची नावे त्यात आली होती. त्यामुळे सत्तार यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांना संधी दिली असून कृषी खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT