abu azmi neutral in maharashtra assembly speaker election  
महाराष्ट्र बातम्या

नाव बदलून काय साध्य केलं, अबू आझमी का राहिले तटस्थ?

आज सभागृहात औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक झालेले पहायला मिळाले

सकाळ डिजिटल टीम

आज सभागृहात औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक झालेले पहायला मिळाले

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडीत शिवसेनेचा व्हिप धुडकावत शिंदे गटाचे राहुल नार्वेकरांना पाठिंबा दिला आहे. नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केलं नसल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. शिवसेना सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सध्या अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे अभिनंदन करण्यासाठी नेते मंडळींची भाषणे सुरु झाली आहे. (abu azmi neutral in maharashtra assembly speaker election)

या भाषणादरम्यान, औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक झालेले पहायला मिळाले. औरंगाबादचे नाव बदलून शिवेसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय साध्य केले असा सवालही आझमी यांनी केला आहे. अशी शहरांची नावे बदलून काय होणार ? याऐवजी नवं शहर उभारून त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं असतं तर, आम्ही त्याचं स्वागत केलं असतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे माजी मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही शहरांचा नामांतराचा निर्णय घेतल्याने आझमी नाराज झाले का? अशी चर्चांना आता उधाणं आलं आहे.

या निवडप्रक्रियेत राहुल नार्वेकरांना बहुमत मिळालं असून राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली आहेत. त्यामुळं राहुल नार्वेकर विजयी झाले असून भाजपा-शिंदे सरकारची विधानसभेवर वर्णी लागली आहे. राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांचे मतदान झाले असून बहुमताचा आकडा पार केला आहे. बहुजन विकास आघाडी आणि मनसेनेही राहुल नार्वेकरांना मतदान केलं आहे. आजच्या अध्यक्षपदाच्या निवडीत शिंदे गटाचा एकही आमदार फुटला नसल्याचं स्पष्ट झालेलं नाही. आज मतदानासाठी 16 जण सहभागी नव्हते. तर यासाठी 12 सदस्य तटस्थ असल्याचे पहायला मिळाले.

काय म्हणाले अबु आझमी?

बहुमतापेक्षा संविधानावर लक्ष देणं आवश्यक आहे. अल्पसंख्याक पक्षांवर नेहमी अन्याय होतो. बहुमातातील सदस्य जर याविरोधात निर्णय घेत असतील तर आम्ही काय करावे, असा सवालही त्यांनी केला आहे. मोठे पक्ष त्यांची कामे तात्काळ कोणत्याही अडचणीशिवाय करवून घेतात. मात्र लहान पक्षांना याचा फटका बसतो. एखादी मागणी करण्यासाठी किंवा विषय मांडण्यासाठी दिवसभर बसावे लागते. भाषणाला सुरु करताच वेळ संपली असे सांगितले जाते, अशा अनेक समस्या त्यांनी यावेळी उपस्थित केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT