Mumbai News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai News: मुंबईत १८ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या; घटनेने परिसरात खळबळ

इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील खिडकीतून त्यांनी उडी मारली

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडुपच्या टेंभिपाडा परिसरात १८ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भांडुप पूर्व परिसरात एका उच्चभ्रू इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २०) घडली आहे. रीना सोलंकी (वय ४७) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

रीना सोलंकी गेल्या ३ महिन्यांपासून विविध आजारांनी ग्रस्त होत्या. तसेच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत्या. परिणामी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. ही घटना भांडुप पूर्व परिसरातील २२ मजली त्रिवेणी संगम हाऊसिंग सोसायटीमध्ये रविवारी सकाळी घडली.

या इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील खिडकीतून त्यांनी उडी मारली. या घटनेनंतर सोलंकी यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. भांडुप पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT