aaditya thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray : ''फुलावरुन नाव असलेले मंत्री काट्यासारखे वागत आहेत'', आदित्य ठाकरेंचा निशाणा कुणावर?

संतोष कानडे

मुंबईः विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मिठी नदीच्या गाळ उपशाप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यावरुन आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.

2005 पासून साल 2023 पर्यंत नदीचा सौंदर्यायासाठी किती खर्च झाला तसेच गाळ काढण्यावर किती खर्च झाला याबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला सामंत यांनी उत्तर दिलं.

यासंबंधाची प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी थेट मणिपूर मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये अशीच चौकशी लावली पाहिजे. तिथे महिलांवर अत्याचार होत आहेत, स्वांतत्र्य सैनिक आणि 'कारगिल'मधल्या सुभेदाराच्या पत्नीची धिंड काढून अत्याचार केला गेला. तरीही कुठे आवाज नाही. 'आप'च्या खासदाराला निलंबित केलं गेलं कारण ते चौकशीची मागणी करत होते. मणिपूरमध्ये, महाराष्ट्रात हुकूमशाही सुरु आहे. त्यामुळे आम्ही 'इंडिया' म्हणून लढत आहोत.

सभागृहात आमदारांना बोलू दिलं जात नाही, या मुद्द्यावरुन बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, एक मंत्री आहेत, ज्यांच नाव फुलावरुन आहे. परंतु ते काट्यासारखे वागत आहेत. प्रणिती शिंदे प्रश्न विचारत असतांना ते भडकले. त्यांचा अभ्यास कच्चा होता म्हणून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्याच आमदार देवयानी फरांदे त्यांच्यावरही ते मंत्री भडकले. उत्तरं येत नाहीत म्हणून दादागिरी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा ठपका ठाकरेंनी ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT