Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted  Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरे म्हणाले, आईपण मला नेहमी हेच म्हणायची की...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून दाखवून दिलं की वर्षा बंगल्याचा मोह नाही. काही लोक वर्षा बंगला सोडायला तयार नव्हते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगला सोडून आपला शब्द पाळला. ज्याला मोह नाही असा मुख्यमंत्री महाराष्‍ट्राला लाभला. आईपण मला नेहमी हेच म्हणायची, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले. (Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted)

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह घेत आज रात्रीच वर्षा बंगला सोडतो असे म्हटले. रात्री मला आपण आजच बंगला सोडत असल्याचे सांगितले आणि आम्ही निघालो. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. म्हणूनच रात्री रस्त्यावर नागरिकांनी, नगरसेवकांनी, शिवसैनिकांनी (Shiv sena) गर्दी केली होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

लोक कसे असतात आणि कधीही बदलू शकतात हे आपण आजवर बघितले आहे. शिवसेनेतून घाण निघून गेली आहे. आता जे काही होईल ते चांगलं होईल. मात्र, मुख्यमंत्री शब्दाला जपणारा माणूस आहे. काळजी घेणारा माणूस आहे. प्रत्येक घरात पोहोचलेला माणूस आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पक्षप्रमुखांची भाषणे सर्वांनी ऐकली आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करून नागरिकांशी संवाद साधला. नगरसेवकांनी संवाद साधला. कोरोना काळातही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘फेसबुक लाईव्ह’ अशी ओळख निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात सर्वांची काळजी घेतली, असेही उद्धव ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

आता जे काही होईल ते चांगलेच होईल

मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केलेल्या कामांमुळेच त्यांची टॉप पाच नेत्यांमध्ये स्थान मिळाले. यावरून त्यांनी किती चांगले काम केले हे सिद्ध होते. मात्र, आता दगा मिळाला आहे. हा दगा कोणा दुसऱ्यांकडून नाही. विरोधकांकडून नाही तर आपल्याच माणसांकडून मिळाला. याचे मात्र दुःख आहे. दगा झाल्याने पक्षातून घाण निघून गेली. आता जे काही होईल ते चांगलेच होईल. याचा विश्वास आहे, असेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT