Aditya Thackeray said that Shinde was offered the post of Chief Minister sakAditya Thackeray said that Shinde was offered the post of Chief Ministeral media
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी आमदार एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावले होते. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का असे सरळ विचारले होते. मात्र, त्यांनी नाटक केलं. अस झालं तसं झाल, हे ते सांगितले. शेवटी जे व्हायचे होते ते २० जून रोजी झाले. त्यांनी बंड केला, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले. (Aditya Thackeray said that Shinde was offered the post of Chief Minister)

सांताक्रुझमध्ये युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे बोलत होते. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी (uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावेळी शिंदेंनी अस झालं तसं झाले म्हटले होते. या फाईल थांबवल्या थांबवल्या, त्या फाईल थांबवल्या असे म्हटले होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मात्र, त्यांनी २० जून रोजी बंड पुकारला. त्यांनी बंड पुकारल्याने सर्व मान सन्मान गमावला. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, तो तुम्ही बघितलाच असेल. आज हा मेळावा गुवाहाटीतून बंड पुकारलेले आमदार बघतच असले. ते म्हणत असेल किती गर्दी झाली आहे मेळाव्याला, असेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे. आता घाण साफ झाली आहे. फुटीरवादी लोक शिवसेनेत नको आहे. त्यांना माफ केले जाणार नाही. बंडखोरीनंतर शिवसेनेला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे (uddhav Thackeray) प्रत्येकावर लक्ष असते. त्यांनी सर्वांना न्याय दिला. मात्र, त्यांनीच आज शिवसेनेला धोका दिला. या बंडखोरांची आज अशी स्थिती झाली की त्यांना आरशात सुद्धा पाहायला लाज वाटते. आमदारांना कैद्यांप्रमाणे नेले. जे विकले गेले ते परत येऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

तुम्ही शिवसैनिक (Shiv sena) आहात. बंड करायचाच होता तर मुंबईत करायचा असता. सुरतला पळून जाण्याची गरज नव्हती. तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात. तुम्हाला पळून जाणे शोभत नाही. सुरतवरून गुवाहाटीत पळून गेले. येथे येऊन बोला, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT