Aditya Thackeray tweet makar sankranti wishes cm eknath shinde maharashtra politics news  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : "तिळगुळ घ्या आणि…"; मकर संक्रांतीनिमीत्त आदित्य ठाकरेंच्या शिंदे सरकारला शुभेच्छा अन् टोमणे

सकाळ डिजिटल टीम

आज राज्यात मकर संक्रातीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे, यादरम्यान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच शुभेच्छा देताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर देखील भाष्य केलं आहे. "तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्रहिताचं बोला!" असे ट्विट करत स्वच्छ राजकारणाने मनं जोडण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

मागील काही दिवसांपासून महापुरूषांचा अपमान केल्यावरून चांगलेच राजकारण पेटलं होत, तसेच राज्यातील उद्योग इतर ठिकाणी गेल्याने देखीव विरोधकांकडून सत्ताधारी एकनाथ शिंदे-भाजप सरकारला धारेवर धरण्यात आलं. याची देखील आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली आहे. तसेच हे सगळं होत असताना जनतेचे नुकसान होत आहे त्यांमुळे द्वेष आणि खेटेपणा सोडण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा देताना केलं आहे.

आदित्य ठाकरेंनी काय म्हटलंय?

"तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्रहिताचं बोला! महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या द्वेशाच्या राजकारणामुळे सर्रास बेताव विधानं होत आहेत, महापुरुषांचे अपमान होत आहेत, स्त्रियांचा अपमान होत आहे, सामाजिक वातावरण गढूळ होत आहे आणि या साऱ्यात जनतेचं प्रचंड नुकसान होत आहे! द्वेष आणि खोटेपणा सोडा, स्वच्छ राजकारणाने मनं जोडा!" अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

काल ठाण्यातील घोडबंदर भागात ठाकरे गटाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. यावेळी ज्या व्यक्तिला आम्ही पुढे आणले. त्या एका गद्दाराने राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले, याची लाज वाटते अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

SCROLL FOR NEXT