Prasad Lad Esakal
महाराष्ट्र बातम्या

Prasad Lad: शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर प्रसाद लाड म्हणाले...

शिवरायांचा जन्म कोकणात; प्रसाद लाडांचे वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

एकिकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच, आणखी एका नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू झाला आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदाराच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून त्यांच्या वाक्याचा निषेध नोंदवला आहे. अशातच आता प्रसाद लाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात बोलताना प्रसाद लाड म्हणले की, कालच माझं वक्तव्य मी सुधारल होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा मी निषेध करतो. ज्या भावनेतून आम्ही कार्यक्रम केला स्वराज्य कोकण भूमी त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हंटलं होतं. त्यानंतर मी माझी चुकही सुधारली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पहिलं तर लक्षात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमि कोकण आहे आणि जन्म शिवनेरीवरती झाला असं माझ्या शेजारी असलेल्या संजय जाधव यांनीही सांगितलं. तरीदेखील छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन राष्ट्रवादी राजकारण करत आहे. तरीदेखील माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असंही ते म्हणाले आहेत.

लाड यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन करता आमदार प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या बाजुलाच भाजप नेते प्रवीण दरेकर बसले होते. तेदेखील प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर काहीच बोलले नाहीत.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केल्यानंतर समोर बसलेल्या काहींनी कुजबूज करत शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला, असे लाड यांना सांगून पाहीले. मात्र, त्यानंतरही लाड यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला नाही की त्याची दुरुस्ती केली नाही. पण सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शिवरायांचे बालपण कोकणात गेले. रायगडावर गेले. येथे त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, असे वक्तव्य वादाग्रस्त विधानानंतर लाड यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसामुळे मिळालेल्या मदतीची रक्कम वजा करून मदत दिली जात - संजय पाटील घाटणेकर

SCROLL FOR NEXT