Aditya Thackeray and Balasaheb Thorat Sakal
महाराष्ट्र बातम्या

आधी लग्नसोहळे, मेळावे उरकले; कोरोना वाढताच कार्यक्रम रद्द

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांकडून सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात (Maharashtra) आहे. ओमिक्रॉनचं (Omicron) संकटही राज्यावर असून आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली केल्या जात आहे. दरम्यान, पाच दिवसाच्या अधिवेशन काळात राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती. त्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं खळबळ उडाली आहे.

आता कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि निर्बंध लागू कऱण्याच्या हालचाली होत असताना महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांकडून सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. युवासेनेचे राज्यव्यापी अधिवेशन स्थगित करण्यात आल्याची माहिती युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी दिली आहे. याशिवाय मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही कोरोना पार्श्वभूमीवर दरवर्षी होणारा भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सव रद्द केला आहे. यामुळे आता उशिरा का होईना नेत्यांना शहाणपण सुचले अशीच चर्चा सुरु आहे.

युवासेनेचं (Yuvasena) झंझावात हे राज्यव्यापी अधिवेशन होणार होतं. नाशिक येथे ८ आणि ९ जानेवारी रोजी या अधिवेशनाचे आय़ोजन करण्यात आलं होतं. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सुचनेनुसार अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर दरवर्षी होणार भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सव रद्द करण्यात आल्याचं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. या कार्यक्रमाला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सहभागी होणार होते. तसंच या कार्यक्रमात पुरस्कार सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहून कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या सभा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात असे आदेशही राज्य सरकारने जारी केले आहेत.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की, नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावताना आयोजकांना योग्य त्या सूचना द्यायला हव्यात. तसंच नागरिकांनीसुद्धा गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर अधिवेशनावेळी सभागृहातच सर्व नेत्यांचे कान टोचले होते. सभागृहात बोलताना तुम्हाला मास्कमुळे अडचण होत असेल तर काढा, त्यानंतर निदान जागेवर बसल्यावर तरी मास्क लावा, कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखा असं म्हणत अजित पवार यांनी सभागृहातच मास्क न घातलेल्या नेत्यांना सुनावलं होतं.

गेल्या चार दिवसात दररोज एक ते दोन नेते, आमदार, खासदार आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सोशल मीडियावरून देत आहेत. इतकं सगळं झालं तरी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त मास्कशिवाय भेटीगाठी करताना दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT