Rohit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : "त्या तर माझ्या मोठ्या भगिनी" ; प्रणिती शिंदेंच्या संतापानंतर रोहित पवार नरमले

सकाळ डिजिटल टीम

Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असं विधान केले होते. रोहित पवारांच्या या विधानाचा प्रणिती शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. दरम्यान यावर रोहित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. 

रोहित पवार म्हणाले, "आमदार प्रणीती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत. पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया. राहीला प्रश्न सोलापूरच्या जागेचा तर त्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, मी कुठलाही दावा केला नव्हता, मी केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली होती."

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या होत्या - 

"कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल" असं म्हणत प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना कडक शब्दांत उत्तर दिलं होतं.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ कोणी लढवयाचा, या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक येत्या महिना, दोन महिन्यात होईल, असा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची, हे देखील त्याच बैठकीत ठरेल, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असे वाकयुद्ध रंगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT