Udhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Udhav Thackrey: ठाकरे गटाला पुन्हा धक्का! वैभव नाईकांनंतर आणखी एका आमदाराला ACBची नोटीस

जे काही निष्ठावंत समजले जातात त्यांना नोटिस आणि दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा सुरू

सकाळ डिजिटल टीम

राज्यात शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार, खासदार आणि मंत्री शिंदे गटात जाऊ लागले. जे काही निष्ठावंत समजले जातात त्यांना नोटिस आणि दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एन्टी करप्शन ब्युरोकडून नोटीस मिळाली आहे.

आमदार राजन साळवी यांना आता एसीबीने चौकशी करण्यासाठी नोटीस जारी केली आहे. यामुळे ठाकरे गटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कोकणमधील राजन साळवी हे शिंदे गटात सहभागी न होता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम राहिलेत. याआधी माझी निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी कायम आहे आणि असेल, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

दरम्यान मालमत्तेच्या चौकशीच्या संदर्भात दोन दिवसांनी म्हणजेच येत्या 5 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. राजन साळवी यांना आजच ही नोटीस मिळाली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातील राजन साळवी हे ठाकरे यांच्या शिवसेनेत एकनिष्ठ राहिलेले आमदार आहेत. तर ते तीन वेळा राजापूर मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT