CM Eknath Shinde
CM Eknath Shinde  Esakal
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: महिलेच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारला जाग; CM शिंदेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

आपल्या कामाची दाद मागण्यासाठी आलेल्या तीन जणांनी सोमवारी एकाच दिवशी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी उपचारादरम्यान विष घेतलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (After the woman suicide CM Eknath Shinde important decision )

राज्य शासनाने सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार आहात हे मंत्रालयातील दालनाबाहेर एका फलकावर लिहा, असे आदेश सर्व मंत्र्यांना दिले आहेत तसेच विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून तशी वेळ राखून ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी सायंकाळी परिपत्रक जारी केले. मंत्र्यांनी कामाचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यागतांना भेटी देण्यासाठी आठवडा, पंधरवडा, महिना यातील ठरावीक दिवस व वेळ निश्चित करावी.

त्याची कल्पना अभ्यागतांना यावी, म्हणून भेटीचा दिवस व वेळेची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा. लाेकांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका, असे निर्देश दिले आहेत.

नेमकं घडलं तरी काय?

शीतल यांच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसीत प्लॉट होता. २०१० मध्ये एमआयडीसी अधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रे बनवून हा प्लॉट दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा त्यांचा दावा होता. दाद मागण्यासाठी त्या मंत्रालयात आल्या होत्या. विष घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon case: भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर

CM Eknath Shinde: महाराष्ट्रात सभा घेतल्या पण मराठा आरक्षणाबद्दल PM मोदी का बोलले नाहीत? CM शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Ghatkopar Hoarding Collapse: भावेश भिंडे कोणाचा पार्टनर? घाटकोपरच्या दुर्घटनेवरून नितेश राणे यांचे गंभीर आरोप

Marathi News Live Update: भावेश भिंडेला फरार घोषित करा; मुंबई होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्यांची मागणी

Viral Video: 'अदित्य ठाकरे, गॅस सिलिंडरला मत द्या,' वंचित'च्या कार्यकर्त्यांचे आवाहन; पुढे काय झाले पाहा

SCROLL FOR NEXT