railway esakal
महाराष्ट्र बातम्या

Agneepath Yojana : बिहारमधील आंदोलनाने रेल्वेसेवा कोलमडली; अनेक गाड्या रद्द

केंद्राच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : केंद्राच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये संतप्त आंदोलकांनी तब्बल १२ रेल्वे जाळल्या आहेत. जाळपोळीचे हे लोण आता १३ राज्यात पसरले असल्याने याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. यामुळे भुसावळ विभागात धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या तब्बल १५ तासांहून अधिक उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने काही प्रवासी रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकातील प्रवासांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

मनमाड जंक्शनमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात ये-जा करणाऱ्या रेल्वे येथूनच मार्गस्थ होतात. मात्र या आंदोलनामुळे काही गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मनमाड जंक्शनमधील प्रवासांचे वेळापत्रक कोलमडले आहे. शनिवारी (ता. १८) भागलपूर कुर्ला रेल्वे रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक १२३२१ हावडा - मुंबई मेल सहा तास विलंबाने धावत होती. गाडी क्रमांक १७०५७ सिकंदराबाद- मुबंई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस तब्बल बारा तासाच्या विलंबाने धावत होती. गाडी क्रमांक १२५२० कामाख्या - कुर्ला नऊ तास उशिराने धावत होती. गाडी क्रमांक १७००१ साईनगर- सिकंदराबाद एक्स्प्रेस ही गाडी रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतावी - पुणे झेलम एक्स्प्रेस दोन तास विलंबाने धावत होती. गाडी क्रमांक १२७३० निजामुद्दीन- वास्को गोवा एक्स्प्रेस दोन तास विलंबाने धावत होती. गाडी क्रमांक १२१५० दानापूर- पुणे एक्स्प्रेस ही गाडी आज रद्द करण्यात आली. त्यामुळे मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकात प्रवास करणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक प्रवासीगाड्या मोठ्या विलंबाने धावत होत्या.

या गाड्या केल्या रद्द

प्रशासनाने जाहीर केल्यानुसार गाडी क्रमांक १२२९६ दानापूर- बंगलोर ही गाडी रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक १३२०१ दानापूर- कुर्ला, गाडी क्रमांक १२१५० दानापूर- पुणे, गाडी क्रमांक १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते पाटलीपुत्र, गाडी क्रमांक १७००१ साईनगर- सिकंदराबाद एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १७०६३ / ६४ मनमाड - सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०३४ दरभंगा- पुणे एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १७०५७ / ५८ सिकंदराबाद- मुंबई - सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस या महत्त्वपूर्ण प्रवासीगाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केले आहेत.

दक्षिण मध्य रेल्वे विभागातून मनमाडमार्गे सिकंदराबाद, साईनगर, शिर्डी येथे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. हजारो प्रवासी शिर्डी येथून मनमाड येथे येतात व येथून दक्षिण भारतात जाण्यासाठी रेल्वे पकडतात; पण नेमक्या या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT