ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

रेड अलर्ट दिला की, पाऊसचं पडत नाही; अजित पवारांची फटकेबाजी

हवामान खात्यातर्फे काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला होता.

सकाळ डिजिटल टीम

AJit Pawar On IMD Rain Alert : हवामान खात्यातर्फे काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक ठिकाणच्या शाळांना त्या त्या भागातील जिल्हाधीकाऱ्यांना सुरक्षेच्यादृष्टीने शाळांना सुटी जाहीर केली होती. मात्र, काही भागात तुरळक पाऊस सोडला तर हवामान खात्याचा हा अंदाज सपशेल चुकल्याचे समोर आले. हवामान खात्याच्या या अंदाजवार राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले की, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्यात न पाऊस पडतोय ना अंदाज बरोबर येतायेत. मात्र, या अंदाजामुळे त्या त्या भागातील जिल्हाधिकारी शाळांना सुट्टी जाहीर करत आहेत. हवामान खात्याच्या अलर्टनंतर पुणे आणि पिंपरी परिसरातील शाळांना तीन दिवासांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पाऊस तर पडला नाही.

एकतर पहिलेच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा व्यवस्थित भरल्या नाही. त्यात आता रेड अलर्टमुळे शाळांना सुट्ट्या देण्यात येत आहेत. मात्र, अंदाज चुकत आहेत. त्यामुळे अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने जो काही खर्च करायचा आहे तो करावा त्याला आमचा पाठिंबा असेल. यात फक्त अचूक अंदाज मिळाले पाहिजे हीच अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी परदेशातील हवामान खात्याच्या अंदाजाचे उदाहरणदेखील दिले. त्यांचे अंदाज खरे ठरतात मात्र, आपल्या हवामान खात्याने रेड अलर्ट दिला की पाऊस गायबच होतो. त्यामुळे अचूक अंदाजांसाठी काय करता येईल यावर ठोस उपाय योजना करण्यात याव्यात असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : ठाण्याची हवा बिघडली 25 हून जास्त हॉटस्पॉट..

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT