Ajit Pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : मग शिंदे उठतात कधी? अजित पवारांना पडला प्रश्न

अजित दादा सकाळी सहा वाजता उठून काम करायचे असे विधान सुप्रीय सुळे यांनी केले होते.

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतात असं सांगितलं जातंय, पण मग मुख्यमंत्री कधी उठतात? असा खोचक सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टवरून शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत वेदांता आणि फॉक्सकॉनबाबत तरूणांनी आवाज उठवणं गरजेचं असल्याचे पवार म्हणाले.

अजित दादा सकाळी सहा वाजता उठून काम करायचे असे विधान सुप्रीय सुळे यांनी केले होते. त्यावर दादा सकाळी सहा वाजता उठून काम करतात, ही चांगली गोष्ट आहे, पण मी ताईंना माहिती देतो की, हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांच काम करतो, आणि हे काम मी महाराष्ट्रासाठी करत राहाणार त्यामध्ये कोणताही खंड पडू देणार नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले होते. त्यानंतर आता स्वतः अजित पवारांनी शिंदेंच्या पहाटे सहापर्यंत काम करण्याच्या पद्धतीवर खोचक प्रश्न विचारत शिंदे पहाटे सहापर्यंत काम करतात मग उठतात कधी असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय म्हणाले होते शिंदे

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंची पैठण येथे सभा पार पडली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोणाला काय वाटेल ते बोलू द्या, अजित दादा सकाळी सहा वाजता उठून काम करायचे असे सुप्रीया सुळे म्हणाल्या होत्या. आधी दादा टीका करायचे आता ताई देखील सुरू झाल्या आहेत. टीका करणं त्यांचं काम आहे, विकासाचं काम करत राहणे हे आमचं काम आहे, आम्ही कामातून उत्तर देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

ताई म्हणाल्या की सहा वाजता उठून दादा काम करतात, ही चांगली गोष्ट आहे, पण मी ताईना माहिती देतो की हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांच काम करतो, आणि हे काम मी महाराष्ट्रासाठी करत राहाणार त्यामध्ये कोणताही खंड पडू देणार नाही अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिले होते. त्यानंतर आता अजित पवारांनी शिंदेंवर पहाटेपर्यंत काम करण्यावरून हल्लाबोल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT