Ajit Pawar And Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

सरपंच, नगराध्यक्षांची जनतेतून निवड केल्याने सत्ता केंद्रीत होते : अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बाजार समितीत शेतकऱ्यांना संधी दिली त्यात दुमत असू शकत नाही. मात्र मार्केट कमिट्यांना निवडणुकीचा खर्च करावा लागतो. एवढा मोठा खर्च मार्केट कमिट्या पेलवू शकणार नाही. तुम्ही नगराध्यक्ष, सरपंच थेट करता मग तुम्ही मुख्यमंत्री थेट करा, राष्ट्रपती थेट करा, पंचायतसमिती सभापती थेट करा, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार कडाडून टीका केली. (Ajit Pawar news in Marathi )

सगळ्या नागरिकांनी मतदान करून राष्ट्रपतींची निवडणूक घ्या, असं म्हणत अजित पवार यांनी इतिहासातील संदर्भ दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती १९६२ साली यशवंतराव चव्हाण यांनी केली. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. पंतप्रधानांची निवड खासदारांकडून होती. मुख्यमंत्र्यांची निवड आमदारांकडून होते. तशीच पद्धत नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ठेवली असती तर चांगलं झालं असतं, असंही अजित पवार यांनी म्हटलं.

यावेळी त्यांनी सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याच्या त्रुटी सांगितल्या. ते म्हणाले की, सरपंच एका विचाराचा होतो आणि खालची बॉडी वेगळ्या विचाराची होती. नगराधअयक्षाच्या बाबतीत असच होतं. त्यामुळे कोणी कोणाला विचारत नाही. शिवाय सत्ता एका व्यक्तीच्या हातात केंद्रीत होते. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचा दावा अजित पवार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT