Ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : जीवाला धोका असल्याच्या तक्रारीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; तर त्याला स्टेनगनसह…

रोहित कणसे

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील भाजप नेते रवींद्र साळगावकर यांनी अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याबद्दल अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Complaint Against Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले की, कोणामुळे कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहीजे. ज्यांनी तक्रार केली त्याला पोलिसांनी आणि सरकारने संरक्षण द्यावं. जर त्याच्यात गंभीरता असेल तर स्टेनगन सहित त्याला संरक्षण द्यावं.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मी कायदा सुव्यवस्था, संविधान पाळणारा माणूस आहे. माझ्याकडून धोका असण्याचं काही कारण नाही. राजकीय धोका असू शकतो पण फिजीकल धोका असू शकत नाही असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. मात्र साळगावकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर लिहून दिलेली तक्रार पोलिसांनी स्वीकारली आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

तक्रारीत काय म्हटलंय...

साळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर ई स्क्वेअरच्या समोर एक प्लॉट आहे. या प्लॉटची मोजणी करण्यासाठी अजित पवार यांनी दबाव आणला आहे. अर्थात ही मोजणी करता येत नाही. तर या प्लॉटच्या फाइलवर पवारांचं नाव आहे आणि मी याची माहिती घेतोय याला विरोध करतोय. त्यामुळे अजित पवार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ...तर राजकारण सोडून देईन, अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील जंतरमंतरवरून आव्हान

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT