ajit pawar on delay in meet with amit shah over farmers issue political news  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमित शाहांसोबतची भेट का लांबणीवर पडली? अजित पवारांनी सांगितलं कारण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणार होते, राज्यात निर्माण झालेल्या शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी ही भेट होणार होती.

रोहित कणसे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जाणार होते, राज्यात निर्माण झालेल्या शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी ही भेट होणार होती. मात्र काही कारणास्तव ही भेट पुढे ढकलण्यात आल्याने याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता खुद्द अजित पवारांनीच ही भेट लांबणीवर का पडली याबद्दल खुसाला केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान आज सकाळी त्यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अमित शाह यांच्यासोबतच्या नियोजीत भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ही भेट लांबणीवर का पडली असे प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, जाणार होतो पणे अमित शाह यांचा निरोप आला, तिथं अधिवेशन चालू होतं. तीन महत्वीची बिलं त्यांना मंजूर करायची होती. लोकसभेचं महत्वाचं काम चालू असल्याने या कामातून मोकळं झाल्यानंतर तुम्हाला बोलवतो, असा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निरोप देण्यात आला आहे, असे अजित पवार म्हणाले.

आज दुपारपर्यंत मी पुण्यात आहे, उद्या बारामतीमध्ये आहे, परवा मी पुन्हा पुण्यात असेल. या दोन तीन दिवसांत जर बोलवलं तरा आम्ही दोन तीन दिवसातील ठरलेले कार्यक्रम रद्द करून भेटीसाठी जाऊ असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi on Rahul Gandhi : 'विरोधी पक्षात असे काही नेते आहेत, जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात, परंतु...’’

Pune University Flyover : गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू; वाहनचालकांना कोंडीपासून काहीसा दिलासा

Mumbai News : रोषणाईपासून बससेवेपर्यंत… गणेशोत्सवासाठी बेस्टची फुल तयारी

Crime News : नागा साधूच्या वेशात फसवणूक; नाशिकमध्ये संमोहन करून अंगठी व रोकड लंपास

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

SCROLL FOR NEXT