Ajit Pawar on Shivsena Balasaheb Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thackeray : बाळासाहेब हिंदू धार्जिणे होते, हे अर्धसत्य; अजित पवारांचे विधान

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar on Shivsena Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्ता आज विधान भवनात त्यांच्या तैलचित्र लावण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त हे तैलचित्र लावण्यात आलं आहे. या तैलचित्र अनावरण कार्यक्रमात विरोधीपक्षनेते अजित पवार यांचे भाषण देखील झाले. यावेळी बोलताना अजित पवारांनी स्व. बाळासाहेब ठाकरेंना हिंदू धार्जिणे होते म्हणणं अर्धसत्य असल्याचे म्हटले आहे.

स्व. बाळासाहेबांची जयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी करणे हे कौतुकास्पद असल्याचे अजित पावार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या बाळासाहेबांसारख्या नेत्याचं तैलचित्र विधी मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावणे ही ही मराठी मणसासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

बाळासाहेब राजकारणात असले तरी ते तसं बघीतलं तर राजकारणी नव्हते त्यांचं जीवन खुल्या पुस्तकासारखं होतं. त्यांच्या वागण्या बोलण्यात विचारात स्पष्टता होती. दुटप्पी पणा नव्हता. जे पोटात तेच ओठात असायचं. बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असताना त्यांचे हे विचार देखील आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा सल्ला देखील अजित पवारांनी यावेळी दिला.

तसेच तैलचित्रातील बाळासाहेबांची ओळख अपूर्ण वाटते कारण प्रतिमेवर हिंदूहृदय सम्राट असं नाव लिहीलं आहे असं कोणीतरी सांगितलं. पण त्याएवजी शिवसेनापक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं करावं अशी मागणी देखील अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

ते हिंदू धार्जिणे होते, हे अर्धसत्य

स्व. बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदयसम्राट आहेतच, त्याबद्दल कुणाच्याच मनात शंकाच नाही. महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या नाही. पण ते हिंदू धार्जिणे होते, हे तसं बघीतलं तर अर्धसत्य आहे. बाळासाहेबांना हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन अशा सर्व धर्मीयांबद्दल आस्था आणि आदर होता आणि आहे. यासाठी अनेक उदाहरण देखील बघता येतील असे अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, १९७२-७३ मध्ये शिवसेनेने रा.सु. गवई यांच्याबरोबर आरपीआयशी युती केली होती. मुंबई महानगरपालिकेत जागा कमी पडल्या असता मुस्लीम लीगचाही पाठिंबा घेतला होता आणि सुधीर जोशींना महापौर केले होते. १९७९ शिवसेना आणि मुस्लिम लीगच्या नेत्यांची संयुक्त सभा झाली होती आणि दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपिठावर होते.

बाळासाहेब हे मुस्लिमविरोधक होते असं म्हणणं योग्य नाही. पण भारतविरोधी पाकिस्तान धार्जिण्यांच्या विरोधात ते होते हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT