Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : "साहेबांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतील" अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना दिल्या शुभेच्छा

Sandip Kapde

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्ष संघटनेत दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा पवारांनी केली आहे. तर अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाहीत. त्यामुळे अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.

आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे, असे अजित पवार म्हणाले.

शरद पवारांनी गेल्या महिन्यात राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती

शरद पवार यांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर पक्षाच्या सदस्यांसह इतर राजकीय नेत्यांकडून तीव्र विरोध झाला होता. पवार यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीच्या पॅनेलने 5 मे रोजी त्यांचा राजीनामा फेटाळला होता. त्यांना पक्षाचे अध्यक्षपद कायम ठेवण्याची विनंती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT