महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवार रमले पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये; शाळेच्या रजिस्टरवर होतं नाव

Ajit Pawar: त्या रजिस्टरमधील त्यांनी त्यांच्या नावासह विद्यार्थी दशेत त्यांच्यासमवेत असलेल्या मित्रांच्या नावावरही नजर टाकत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मिलिंद संगई, बारामती

आयुष्यात कितीही मोठा टप्पा गाठला तरी प्रत्येकाला त्याच्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देणे आनंददायी वाटते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. पन्नास वर्षांपूर्वीच्या शालेय जीवनातील क्षण त्यांच्या नजरसमोरून तरळून गेले.

बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनिच्या वतीने आयोजित म.ए.सो. क्रीडाकरंडकाच्या पारितोषिक वितरणासाठी अजित पवार रविवारी उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत अजित पवार बारामतीतील म.ए.सो. च्या शाळेत विद्यार्थी म्हणून शिकले. आजच्या कार्यक्रमादरम्यान शाळेने त्यांच्या काळातील त्यांचे नाव असलेले रजिस्टर आवर्जून त्यांना दाखविण्यासाठी आणले होते.

त्या रजिस्टरमधील त्यांनी त्यांच्या नावासह विद्यार्थी दशेत त्यांच्यासमवेत असलेल्या मित्रांच्या नावावरही नजर टाकत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या प्रसंगी केलेल्या भाषणामध्येही अजित पवार यांनी पोतनीस, बडवे, दंडवते, घारे या सारख्या गुरुवर्यांचाही त्यांनी आदराने उल्लेख केला. जून 1968 ते जून 1974 या काळात अजित पवार बारामतीतील म.ए.सो. विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकण्यासाठी होते. अकरावीला त्यांनी प्रवेश घेतला होता पण ते कोल्हापूरला शिक्षणासाठी गेल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने अनेक विद्यार्थी घडविले. यात अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार यांचा समावेश आहे, मात्र आजमितीस सर्वात सक्षम माजी विद्यार्थी म्हणून अजित पवारांचा उल्लेख बाबासाहेब शिंदे यांनी करताना त्यांनी शाळेच्या मुलभूत सुविधांच्या विकासासाठी हातभार लावण्याची अपेक्षा बोलून दाखवली.

अजित पवार यांनीही शाळेच्या व्यवस्थापनाने आराखडा तयार केल्यास इमारत व मुलभूत सुविधांसाठी मदत करण्याची ग्वाही दिली. ज्ञानदानाचा अखंड यज्ञ चालविणा-या या संस्थेस शक्य ती सर्व मदत करु असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Latest Marathi News Live Update : अकोला दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री बावनकुळेंचा संवाद; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

SCROLL FOR NEXT