Ajit Pawar said he don't know anything about Shiv Sena's Mahesh mahesh kothe
Ajit Pawar said he don't know anything about Shiv Sena's Mahesh mahesh kothe 
महाराष्ट्र

शिवसेनेच्या महेश कोठेंविषयी मला काही माहिती नाही : अजित पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे : सोलापूरचे शिवसेनेचे नेते महेश कोठे राष्ट्रवादीत येणार ही चर्चा आहे, मात्र महेश कोठे हे अस्वस्थ आहेत, महाविकास आघाडीत कार्यक्रम ठरवत असताना इकडचे लोक तिकडे घ्यायचे नाहीत, असं ठरलेलं आहे, मात्र कोणी कोठे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र महेश कोठे यांच्याविषयी मला जास्त काही माहिती नाही',' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकांराशी बोलतांना दिली

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल दहा महिन्यांपासून बंद आहे. याबाबत पवार अजित पवार म्हणाले, ''लोकल कधी सुरू होईल हा केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाचा प्रश्न आहे, मात्र राज्यात कोरोनाची स्थिती निंयत्रणात येत असताना सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सुरळीत केल्या जातील, त्यामुळे हळूहळू सुरू करण्याचा आमचा विचार आहे.''

हेही वाचा - ट्रम्प यांच्या ट्विटरला मुसक्या; 'हिंसक टिवटिव'ची शक्यता वर्तवून अकाऊंट कायमचं बंद

भंडारा येथील घडलेल्या दुर्घटनेवरुन राज्याचे माजी ऊर्जामंत्री, भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे  यांनी सरकारवर आरोप केले होते. त्यालाउत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ''ऑडीट कोणाच्या काळात झालं यापेक्षा काय करता येईल हे महत्वाचं आहे. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी काही बोलणार नाही, मात्र मी ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत. पिडीत कुटूंबातील व्यक्तींना 5 लाख रुपयांची मदत आम्ही जाहीर करत आहोत. ड्युटीवर एक व्यक्ती असायला हवी होती, मात्र ती तिथं नव्हती, का नव्हती? याची चौकशी केली जाईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT