Ajit Pawar
Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र

Sharad Pawar Resigns: "मोठा भाऊ या नात्याने सांगतो..",अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना बोलण्यापासून रोखलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावुक झाले. यावेळी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले होते.

यावेळी अजित पवारांनी गोंधळ करत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना गप्प बसण्याचं आवाहन केलं. तरीदेखील नेते, कार्यकर्ते शांत होताना दिसत नव्हते. अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या सर्व नेत्यांनी विनंती करूनही त्यांनी हा निर्णय मागे न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना शरद पवारांची समजूत घालावी अशी विनंती केली. त्यावर 'सुप्रिया तू बोलू नको', असं अजित पवार म्हणाले.

कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांना निर्णय मागे घ्या असं सांगा असं म्हणत असतानाच अजित पवार म्हणाले की, अजित पवारांचं बोलून झाल्यानंतर कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली. सुप्रिया सुळेही समोर बसून सर्व पाहात होत्या. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय, असं सुप्रिया सुळेंना सांगितलं. 

पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल यासाठी एक समिती नेमण्यात येणार असून समितीच्या निर्णयानुसार पुढचा अध्यक्ष ठरवण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची आणि निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या" अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते -पंतप्रधान मोदी

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT