Ajit Pawar on Eknath Shinde govt  esakal
महाराष्ट्र बातम्या

मी कुठे पैसे देण्यात भेदभाव केला? अजित पवारांनी मंत्र्यांना आकडेवारीच दाखवली

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यावेळी शिंदे सरकारमधील नेत्यांना टोमणे मारले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आज शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडला असून ते विजयी झाले आहेत. हा विश्वासदर्शक ठराव शिंदे सरकारने बहुमताने जिंकला असून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर टोलेबाजी सुरु केली आहे. (maharashtra politics) निधी देण्यात राष्ट्रवादीने कधीही दुजाभाव केलेला नाही. कुठेही पैसे देण्यात मी भेदभाव केलेला नाही असं सांगत पवारांनी मंत्र्यांना आकडेवारीच दाखवली आहे. (Ajit Pawar on Eknath Shinde govt)

राजकीय घडामोडींमध्ये निधी वाटपावरून राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांवर पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीला बदनाम केलं गेलं. परंतु निधी वाटपात राष्ट्रवादीने कधीच कुणासोबत अन्याय केलेला नाही, असं सांगत अजित पवारांनी मंत्र्यांना आकडेवारी दाखवली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदेंना 12 हजार कोटी दिले, असे सांगत पवारांनी सेना नेत्यांना दिलेल्या निधीची यादी वाचून दाखवली आहे. (Ajit Pawar Speech)

पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आग्रहामुळे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे भाजपमध्ये गेल्यानंतर म्हणतात की, महाविकास आघाडी ही अनैसर्गिक युती आहे. राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केलाय. मात्र मी आमदारांचा निधी एक कोटीवरून पाच कोटी केला त्यांचा विकास निधीही वाढवला. मुख्यमंत्र्यांच्या खात्याला १२ हजार कोटी दिले. एकनाथ शिंदे यांनी मला खासगीत सांगितले होते की, अजून निधी द्या. मी भेदभाव करणार माणूस नाही. सगळ्यांना निधी लागतो हे मी जाणतो. मी पर्यटन खात्यालाही निधी दिला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे अजित पवार म्हणाले, १०६ आमदार असलेल्या पक्षाचा आमदार मुख्यमंत्री नाही मात्र ४० आमदार असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो यात नक्की काहीतरी काळबेरं आहे त्यामुळे जपून रहा, असा सल्लाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे. पुढे ते म्हणाले,

अजित पवारांनी सांगितली निधीची आकडेवारी

मी एकूण ३६६ कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे. उदय सामंतांना २३१ कोटी निधी दिला आहे. मी कधीही कोणत्याही आमदाराला रिकाम्या हाताने परत पाठवलेले नाही किंवा कुणाहीसोबत भेदभाव केला नाही. गुलाबराव पाटलांना ३०९ कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे कारण नसताना राष्ट्रवादीला बदनाम केलं. निधीवाटपावरून कॉंग्रसे नेत्यांनीही राष्ट्रवादीला दोषी ठरवलं मात्र तेव्हाही मी शांत राहिलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT