Ajit Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Karnataka Election Result: अजित पवारांच सूचक ट्विट; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

अजित पवार यांच्या ट्विटमुळे राज्यात खळबळ

धनश्री ओतारी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. कानडी जनतेने भाजपला नाकारले आहे. देशभरात काँग्रेसचा जल्लोष सुरु असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळं भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.( Ajit Pawar tweet on Karnataka Election Result maharashtra politics bjp MVA)

कर्नाटकामधील निकालाची महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होईल, अस सूचक विधान अजित पवार यांनी ट्विटमध्ये केलं आहे. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काय आहे ट्विट?

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे. असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे.

त्याच्या खूप पुढे जात 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT