School Education Minister Varsha Gaikwad esakal
महाराष्ट्र बातम्या

शाळेतील पटसंख्या वाढीसाठी 'मुले शिकवा'ची विशेष मोहीम

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यांनतर 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या. मात्र, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीत 65 टक्‍क्‍यांवर गेलेली नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील एक लाख 10 हजार 229 शाळांमध्ये सव्वादोन कोटी विद्यार्थी प्रवेशित आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यांनतर 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या. मात्र, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीत 65 टक्‍क्‍यांवर गेलेली नाही. कोरोना काळात शाळाबाह्य मुलांची संख्या खूपच वाढली असून बालविवाहाचे प्रमाणही अधिक राहिले आहे. शाळकरी मुले शेतमजुरीवर दिसतात. आता शाळेतील विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीची कारणे शोधून त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

कोरोनामुळे मार्च 2020 पासून बहुतेक दिवस शाळा बंदच राहिल्या. त्यानंतर पहिली ते सातवीच्या बहुतेक शाळा 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरु झाल्या आहेत. शाळा बंदमुळे मुलगी घरात एकटीच असायची आणि तिची चिंता पालकांना होती. ऑनलाइन मोबाइल घेऊन देण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. सातवी, आठवीत असतानाच विवाह झाल्यास पुढील खर्च कमी होईल, कोरोनाच्या निर्बंधांत स्वस्तात विवाह होतो, पुढे तिच्या शिक्षणाचा, विवाहाचा खर्च मोठा होईल आणि त्या खर्चाचा डोंगर माथ्यावर कायम उभारेल, अशी भितीही पालकांना होती. त्यामुळे बालविवाह वाढल्याचे बोलले जाते. दुसरीकडे कोरोनात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता, शाळा बंद असल्याने मुलेही घरात निवांतच. त्यामुळे ती मुले हॉटेल, वीटभट्टी, हातीगाडीसह अन्य ठिकाणी काम करू लागली. शाळा बंदमुळे चिमुकल्यांना उपस्थिती भत्ताही मिळाला नाही. गणवेश, शालेय साहित्यही नाही. त्याशिवाय उपस्थिती वाढावी म्हणून कोणतीही ठोस योजना नाही. आगामी काळात तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून एक स्वतंत्र योजना आखली जात आहे.

स्वतंत्र सर्वे करून त्याची नेमकी कारणे शोधली जातील

कोरोना काळात बालविवाह वाढले असून शाळाबाह्य झालेल्या मुलांचे प्रमाणही अधिक आहे. शेतमजुरीसह अन्य ठिकाणी बालके काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे बालरक्षकांच्या मदतीने बालविवाह, बालमजुरीचा स्वतंत्र सर्वे करून त्याची नेमकी कारणे शोधली जातील. त्यानंतर सरकार पातळीवर ठोस उपाययोजना केल्या जातील.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

शाळाबाह्य मुलांची वाढली संख्या
राज्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या आजवर कधीही 10 ते 15 हजारांवर गेली नाही. मात्र, सप्टेंबर 2020 मधील सर्व्हेमध्ये मुंबई उपनगर, पालघर, नाशिक, नंदुरबार, अकोला, मुंबई, नगर, जळगाव, ठाणे, सोलापूर, बीड, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शाळाबाह्य मुले आढळली. विशेषत: बुलढाणा, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्ह्यातील काही भागाचा सर्व्हे कोरोनामुळे होऊ शकला नाही. तरीही, राज्यभरात तब्बल 25 हजार 204 मुले शाळाबाह्य आढळली. त्यात जवळपास 300 मुले बालमजूर होती. आता ही संख्या 50 हजारांहून अधिक झाल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन येत्या ११ जूनला होणार

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT