CM Eknath Shinde News Esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde: CM शिंदे आणखी एका पत्ता उघडण्याच्या तयारीत; ठाकरेंच्या पक्षाकडे असलेलं आणखी एक पद जाणार?

ठाकरेंच्या गटाकडे असलेलं आणखी एक पद धोक्यात

सकाळ डिजिटल टीम

CM Eknath Shinde News: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गट चांगलाच अॅक्टिव्ह झाला आहे.

एकीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्यावर शिक्कामोर्तब केलं, त्यानंतर लगेच शिवसेना आमदारांनी विधिमंडळ कार्यालयावर आणि संसदेतल्या शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवला. यानंतर आता शिंदेंच्या टार्गेटवर असलेलं ठाकरेंच्या गटाचं आणखी एक पद धोक्यात आलं आहे.

विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेते हे पद आहे, पण या पदावरही ठाकरे गटाच पद हातचं जाण्याची शक्यता दिसून येत आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अंबादास दानवे हे सत्तापक्षाचा भाग झाले आहेत, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पदावर ठेवू नये, अशी भूमिका शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते. तसं झालं तर अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यासंबधी अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा विधान परिषदेवर एकही आमदार नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण असावा हा बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असं दानवे म्हणालेत.

याउलट निवडणूक आयोगाने आम्हालाच शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे, त्यामुळे आमचाच व्हीप सगळ्या आमदार-खासदारांना मान्य करावा लागेल, असं शिवसेनेकडून (शिंदे गटाकडून) सांगण्यात येत आहे.

व्हीप मान्य केला नाही तर शिवसेनेकडून ठाकरेंच्या आमदार-खासदारांवर कारवाई करण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी व्हीप झुगरला तर त्यांच्यावरही कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आदित्य ठाकरे हे विधानसभेचे वरळी मतदारसंघाचे तर उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे आमदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT