Eknath Khadse Amit Shah Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shah-Khadse Meet : अमित शहांची भेट, फोन अन् घरवापसीची चर्चा? खडसे म्हणाले...

भविष्यात पुन्हा भेट घेण्याचे दिले संकेत

सकाळ डिजिटल टीम

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शरद पवार यांच्यासह भेट घेणार होते. त्यासाठी खडसे दिल्लीलाही गेले होते, पण शहांची भेट होऊ शकली नाही. केवळ फोनवरुनच त्यांच्याशी बोलणं झालं, अशी माहिती खुद्द खडसे यांनी दिली आहे. तसेच घरवापसीच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं आहे. (Amit Shah Eknath Khadse meeting Khadse said everything)

खडसे म्हणाले, दर महिन्याला मी दिल्लीला जातो. शहा यांच्याकडे माझं व्यक्तिगत आणि सार्वजनिक काम होतं. त्यामुळं मला त्यांची भेट घ्यायची होती. याबाबत मी शरद पवार यांची चर्चा केली होती. त्यानंतर शरद पवारांनी स्वतःच मला सांगितलं की, मी पण तुमच्यासोबत येतो. शरद पवार आणि मी दिल्लीला जाऊन आलो पण अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. पण भविष्यात शरद पवार आणि मी असे दोघेजण अमित शहा यांची भेट घेणार आहोत, याची अपॉईंटमेंट शरद पवार घेणार आहेत.

मी भाजपत जाणार असल्याच्या सर्व चर्चा निराधार आहेत. भाजपत मी ४० वर्षे काढले त्यावेळी मी खूप कष्ट केले त्याची भाजपला मदतच झाली. पण मधल्या काळात मला असं वाटलं की भाजपत माझ्यावर अन्याय होतोय किंवा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळं मी भाजपतून बाहेर पडलो आणि नंतर तीन वर्षे मी भाजपपासून दूर होतो तेव्हा शरद पवारांनी मला आधार दिला. त्यांनी राष्ट्रपती कोट्यातून माझी विधानपरिषदेसाठी शिफारस केली पण ती नियुक्ती होऊ शकली नाही. नंतर त्यांनी निवडून आणलं त्यामुळं ज्या पक्षानं मला राजकारणात पुन्हा सक्रीय केलं तो पक्ष सोडून पुन्हा भाजपत जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं शरद पवारांचं नेतृत्व मी मान्य केलं आहे. सहा वर्षानंतर भाजपत जाण्याचा विचारावर ते म्हणाले, सहा वर्षानंतर आपण राजकारणात असू नसू सांगता येत नाही. त्यामुळं या चर्चांना अर्थ नाही.

देशात एकाच घरात दोन व्यक्ती वेगळ्या पक्षात असल्याचं नवीन नाही. त्यामुळं ज्याच्या त्याच्या विचारधारा घेऊन तो व्यक्ती चालत असतो. जी विचारधारा आपण स्विकारली ती आपण पुढे घेऊन चाललं पाहिजे. रक्षाताई त्यांचं काम करतात मी माझं काम करतो. आमच्यामध्ये अजून तरी काही वाद निर्माण झालेला नाही, असंही त्यांनी यावेळी यासांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT