amol kolhe video on chhatrapati sambhaji maharaj dharmveer swarajya rakshak controversy ajit pawar remark  
महाराष्ट्र बातम्या

Video : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक? अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

नागपूरात झालेल्याअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजे ‘धर्मवीर’ नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असे विधान केले.यावरून वाद पेटला आहे. दरम्यान या वादात आता ऑन स्क्रीन छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका साकरलेले अभिनेते तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मत व्यक्त केलं आहे.

अमोल कोल्हे यांनी एक यूट्यूबवर त्यांचा जवळपास १५ मिनीटांचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी इतिहासातील अनेक दाखले देत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं आहे.

खासदार अमोल कोल्हे हे या व्हिडीओमध्ये इतिहासाकडे तर्कशुद्ध बुध्दीने पाहणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, मी इतिहास संशोधक, गाढा अभ्यासक नाही, पण स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका शिवपूत्र संभाजी हे महानाट्य करत असताना मागचे १३-१४ वर्ष तर्कशुद्ध विचार करत असताना जेजे जाणवलं ते मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच कोल्हे यांनी इतिहासाचे दाखले देत या वादावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

जर आपण बुधभूषण या छत्रपती संभाजी महाराजांनी लिहीलेल्या ग्रंथात धर्माची चिकीत्सा केली आहे, त्यांनी काही श्लोक रचले आहेत. छत्रपती पद धारण केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मांतरावर बंधनं आणली होती, असे अमोल कोल्हे म्हणाले.

इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे त्यामध्ये लिहून ठेवलं आहे की, औरंजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना दोनच महत्वाचे प्रश्न विचारले होते पहिली स्वराज्याचा खजीना कुठे आहे आणि दुसरा औरंजेबाचे कोण-कोण लोक फीतूर आहेत. त्यामुळे जबरदस्तीने धर्मांतर करण्याला संभाजी राजानी नकार दिली याला समकालीन पुराव्यामध्ये कुठलाही आधार मिळत नाही, असे कोल्हे म्हणाले.

तसेच औरंगजेब बादशाहने आदिलशाही, कुतूबशाही नेस्तनाबूत केली त्यामुळे हे धर्म युध्द असण्यापेक्षा ही सत्ता वर्चस्वाची लढाई होती हे लक्षात येतं असे कोल्हे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

MLA Gopichand Padalkar: 'जयंत पाटील यांच्याविषयी एकही शब्द बोलणार नाही': आमदार गोपीचंद पडळकर; घायवळचे अनेक साथीदार रोहित पवारांचे मित्र

Solapur News:'जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज‌'; जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Sinai River: 'कोळेगाव-आष्टे बंधाऱ्याची झाली दुर्दशा'; सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरही पुलावरील वाहतूक अद्याप बंद

SCROLL FOR NEXT