Amol Mitkari said, Uddhav Thackeray will perform the Maha Puja of Panduranga Amol Mitkari said, Uddhav Thackeray will perform the Maha Puja of Panduranga
महाराष्ट्र बातम्या

‘फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक की, शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र?’

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप सरकार स्थापन करेल हे सर्वांना माहिती होते. तसेच देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, असेही बोलले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले. तसेच आपण मंत्रिमंडळात राहणार नसल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयावर आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी ट्विट केले आहे. (Amol Mitkari said, Uddhav Thackeray will perform the Maha Puja of Panduranga)

‘श्री फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे की, शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल.’ असे ट्विट अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केले आहे. या ट्विटवरून त्यांनी भाजपवर शंका व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला पद हवे असल्यास सांगायला पाहिजे होते. मी राजीनामा दिला असता, असे म्हटले होते. कोणतीही नाराजी असल्याच सांगायला हवी होती. असा बंड करण्याची गरज नव्हती, असेही म्हटले होते. माझ्या एकाही आमदाराने म्हटले असते तरी राजीनामा दिला असते, इतकेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

तसेच आदित्य ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी नकार दिल्याचे म्हटले. आता त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी बंड केल्याचेही म्हटले होते.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला, तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवा’ असे खासदार संजय राऊत म्हणाले होते. अशात देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) आणि भाजपने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. असे असले तरी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT