drugs seized

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

गुजरात, अहमदाबादच्या पथकाच्या टीपवर नागपूर डीआरआयने ही कारवाई केल्याने पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची सुद्धा झोप उडाली होती.

सकाळ वृत्तसेवा

drugs seized : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआर) धाडसी कारवाईनंतर गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा एक लाख ११ हजार ९०० रुपये किमतीचे ११ ग्रॅम ३९० मिलीग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले.

संशयित सय्यद नाझिम सय्यद कासीम (वय ३५, रा. पटवा चौक, मसानगंज, अमरावती), असे अटकेतील व्यक्तीचे नाव असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली. यापूर्वी गुन्हे शाखेने सात फेब्रुवारी २०२६ रोजी तीन लाख ८२ हजार रुपयांचे २५.५ ग्रॅम एमडी ड्रग्स संशयित अब्दुल शोएब अब्दुल जब्बार व सईद खान शरीफ खान या दोघांकडून जप्त केले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी अ‍ॅकॅडमी हायस्कूलच्या मैदानातून संशयित समीर खान शमीम खान (वय १९) याला अटक करून १२ ग्रॅमचे एमडी ड्रग्स जप्त केले होते.

त्यानंतर १९ फेब्रुवारीला तिसऱ्यांदा ही कारवाई केली. त्यापूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने नवसारी रिंगरोडवरील एका कारमधून पाच किलो एमडी ड्रग्स जप्त करून चौघांना अटक केली होती. गुजरात, अहमदाबादच्या पथकाच्या टीपवर नागपूर डीआरआयने ही कारवाई केल्याने पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची सुद्धा झोप उडाली होती.

पोलिसांच्या सातत्यपूर्ण अंमलीपदार्थ विरोधी कारवाईनंतरही त्याला अंकुश बसलेला दिसत नाही. त्यामुळे एमडी ड्रग्स छोट्या छोट्या प्रमाणात आणून त्याची विक्री ग्राहकांपर्यंत करणाऱ्यांची पाळेमुळे खोलवर रुतलेली असल्याचे दिसून येते. गुरुवारी (ता.१९) सय्यद नाझीम याला पहिल्यांदा गुन्हे शाखेने अटक केली. यापूर्वी तो अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात सापडलेला नव्हता. त्याच्याकडून एमएच २७ सीई ७८१३ क्रमांकाची ८० हजारांची दुचाकी व १० हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण दोन लाख एक हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित सय्यद नाझीम याने सदर एमडी ड्रग्स कुणाकडून खरेदी केली, याची माहिती त्याने दिली नव्हती.

पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनुने, सुनील लासूरकर, दीपक सुंदरकर, जहीर शेख, सचिन बहाळे, अतुल संभे, सूरज चव्हाण, राजिक रायलीवाले, चेतन कराळे, योगेश पवार, सुधीर गुडधे, राजेश मेंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: "निवडणुकांमध्ये मतदान न केल्यास अटक होणार..."; कोर्टाच्या निर्णयाने चित्र बदललं, CJI सूर्यकांत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर दौऱ्यात पंकजा मुंडेंनाही औद्योगिक प्रदूषणाचा फटका; वाहनांवर काळ्या धुळीचा थर

Traffic Rules: ई-चालान ४५ दिवसांत भरा, नाहीतर...; केंद्र सरकारकडून नवे ट्रॅफिक नियम लागू, वाहनचालकांसाठी इशारा

Police Misconduct : पोलिस कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत हॉस्पिटलमध्ये धिंगाणा; रुग्णांच्या बेडवर लोळले, डस्टबिनमध्ये लघवी केली अन्....

प्राजक्ता माळीने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक, म्हणाली...'त्याच्या बोलण्यातून कधीच चुकीचा शब्द...'

SCROLL FOR NEXT