Eknath Shinde Amruta Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava : एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत! एकनाथ शिंदे जिंदाबाद - अमृता फडणवीस

आपण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांचंही दसरा मेळाव्याचं भाषण ऐकणार असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत. एकनाथ शिंदे जिंदाबाद, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे. दांडियाच्या कार्यक्रमासाठी त्या मुलुंडमध्ये आल्या होत्या. तिथे त्यांनी गाण्यावर ठेकाही धरला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी अमृता फडणवीसांना तुम्ही दसरा मेळाव्यातलं कोणाचं भाषण ऐकणार? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, पॉलिटिकली आपल्याला प्रत्येक नेत्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेणं चांगलं असतं. तर मी प्रत्येकाचं, दोघांचं ऐकीन. पण वैयक्तिकरित्या एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत. पण मी दोघांचंही ऐकेन. यानंतर गर्दी कुठे होईल असं विचारलं असता, एकनाथ शिंदे जिंदाबाद अशी घोषणाही त्यांनी यावेळी दिली.

दसरा मेळावा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी केली जात आहे. दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा मेळावा होणार आहे तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शनासाठी जोरदार तयारी केली जात. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : अकोल्यात नगरसेवक पदाचा अर्ज भरताना उमेदवारानं आणली 5 हजार रुपयांची चिल्लर

Virat Kohli नवीन वर्षातही खेळणार विजय हजारे ट्रॉफीतील सामना, पण कधी आणि कोणाविरुद्ध? जाणून घ्या

Bus Accident : भीषण अपघातात बसमधील पाच प्रवासी जळून खाक; ओळख पटवणं झालं होतं मुश्किल, दोघांचं ठरलेलं लग्न अन् काळाचा...

BMC Election: निवडणुकीसाठी महापालिका सज्ज, ५० हजार कर्मचाऱ्यांचे महाप्रशिक्षण सुरू

SCROLL FOR NEXT