amruta fadnavis tweet after shiv sena women protest 
महाराष्ट्र बातम्या

Video : अमृता फडणवीस-शिवसेना वाद पोहोचला टोकाला; ट्विटरवर वाक् युद्ध 

सकाळ डिजिटल टीम

मुंबई :  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadnavis) आणि शिवसेना यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडवणीस यांच्या कोणत्याही टीकेला उत्तर दिलेलं नाही. शिवसेना कार्यकर्त्यांकडूनच त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आज, अमृता फडवणीस यांच्या आणखी एका ट्विटमुळे या वादाला फोडणी मिळालीय. 

शिवसेनेचं आंदोलन 
अमृता फडणवीस यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी रोष होता. त्यामुळेच शिवसेनेच्या एका महिला आघाडीने अमृता फडवणीस यांना जोडे मारो आंदोलन केले होते. त्या आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करून, अमृता फडवणीस यांनी शिवसेनेवर प्रहार केलाय. 'लोकांच्या डोक्यावर मारून तुम्ही नेतृत्व करू शकत नाही. हा तर हल्ला आहे.', अशा शब्दांत ट्विट करताना अमृता यांनी 'दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे!' अशी शायरी ही केली आहे. शिवसेनेकडून अद्याप यावर प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही. 
 


कोठून सुरू झाला वाद?
​अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यात वादाची ठिकणी पडली ती, औरंगाबादमधील शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या उभारणीवरून. या स्मारकासाठी हजारो झाडांची कत्तल होणार असल्याची बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्याचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर कमिशनखोरीचा आरोप केला होता. त्याला शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटवरून उत्तर दिलं होयं. त्यानंतर अमृता फडवणीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधी यांच्यावर टीका करणारे एक ट्विट रिट्विट करताना, त्यात ठाकरे यांना ओढले होते. 'नावाच्या पुढे ठाकरे लावून कोणी ठाकरे होत नाही.' असा टोला अमृता फडवणीस यांनी लगावला होता. त्यावरून शिवसेना कार्यकर्त्यांनी सताप व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

Sambhajinagar Students Crisis: गॅसअभावी ‘सिपेट’ची मेस बंद; उपाशीपोटी विद्यार्थ्यांनी धरली घरची वाट; ताटात खिचडी, जेवणात अळ्या

Beed Crime: लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीची विक्री अन् अमानवी अत्याचार, थरारक घटनेने बीड हादरले!

शेततळी बनली मृत्यूचे सापळे! मुलांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी; पालकांनी घ्यावी मुलांची काळजी, शेतकऱ्यांना आता शेततळ्याला कुंपण करण्याचे बंधन

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

SCROLL FOR NEXT