Kedar Dighe Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : 'बाळासाहेब म्हणालेच होते....',आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंची CM शिंदेंवर बोचरी टीका

शिवसेनेत फूट पडल्यापासून आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णय़ावर सातत्याने टीका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच राजकीय आणि इतर संबधितांच्या यासंबधीच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

शिवसेनेत मोठी फूट पडल्यापासून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर ते सातत्याने भाष्य देखील करताना दिसतात. दरम्यान, नुकतीच निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली असून यातून त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या शब्दांची आठवण करून देत एकनाथ शिंदे आणि गटावर हल्लाबोल केला आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये केदार दिघे यांनी म्हंटलं आहे की, "शिवसैनिकांना का म्हणाले होते बाळासाहेब... जसं मला सांभाळले तसं उद्धव आणि आदित्य ला सांभाळा... याच उत्तर आज मिळालं! त्यांनी शेवटचा आदेश शिवसैनिकांना दिला,आमदार खासदार यांना हा आदेश का नाही दिला..?याच उत्तर आज मिळालं.दैवी पुरुष असणाऱ्या बाळासाहेबांना माहीत होतं... आपल्या पाठीमागे आपलेच काही गद्दार आमदार आणि नेते हे सत्तेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकटे पाडतील..."

"त्यांना माहीत होतं शिवसेना हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडलं जाईल...शिवसेनेच्या जोरावर पैसा कमावलेले ,ठेकेदार झालेले आमदार,नगरसेवक स्वतःला पक्षा पेक्षा मोठं समजतील...घरातील माणसं देखील विरोधात जातील.."

पुढे ते म्हणतात की, "शिवसेना हा विचार पुढे नेताना दिल्ली समोर झुकायचे नाही ही शिकवण फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे हेच पाळताना दिसत होते... शिवसेनेचा खरा शत्रू हा भाजप आहे.त्यांचा सेनेच्या मतांवर डोळा आहे.काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेची मते घेऊ शकत नाहीत ती हिंदुत्ववादी मते फोडण्याचे काम भाजप करेल...म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घालत शिवसैनिकांवर जबाबदारी टाकली होती...उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना साथ दया...!"

"ते असं म्हणाले नाहीत आमदारांना साथ दया...ते असं म्हणाले नाहीत भाजपला साथ द्या! त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहण्याची ही जबाबदारी आमदार आणि नेत्यांवर दिली नाही तर ही जबाबदारी त्यांनी सामान्य शिवसैनिकांवर दिली..."

पुढे ते म्हणतात आज बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा आदेश पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ते सर्वांना आवाहन करताना म्हणतात, 'चला संपूर्ण देशाला आणि बीजेपीला दाखवून देऊया...हा मराठी माणूस,बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा आदेश पाळतो...भलेही नेते गेले...,भाजपने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असेल...पण शिवसैनिक मातोश्री सोबत प्रामाणिक राहील आणि या गद्दारांना त्यांची जागा दाखवेल!काही झालं तरी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द पडू द्यायचा नाही, शेवटचा आदेश तंतोतंत पाळायचा ही जबाबदारी आपली शिवसैनिकांची आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghodegaon flood : घोडेगाव परिसरात भीमाशंकर रस्ता बंद, घोडनदीच्या पुरामुळे स्मशानभूमी व हरिश्चंद्र महादेव मंदिर पाण्यात

Illegal Sand Transport: अरळीत अवैध वाळू-मुरूम वाहतूक; विना नंबर ट्रॅक्टरच्या बेफाम वेगाने बालकांच्या जीवितास गंभीर धोका

Solapur Illegal Gambling: मंगळवेढ्यातील मटका-जुगार अड्डे बंद करा; भाजप शहराध्यक्षांची मुख्यमंत्र्याकडे ठाम मागणी

Sant Tukaram Palakhi: उरुळी कांचनमध्ये संत तुकाराम महाराज पालखी विसाव्यासाठी ८०x२०० फुटांचा भव्य जलावरोधक मंडप

Sant Gajanan Maharaj Palkhi : संत गजानन महाराजांची पालखी परळीत दाखल, दोन दिवस परळीत मुक्काम

SCROLL FOR NEXT