maharashtra politics 
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटातील २० आमदार आमच्यासोबत, अनिल देसाईंचा खळबळजनक दावा

सुप्रिम कोर्टाने निलंबनाची कारवाई मागे घेतली नसल्यानं आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार

सकाळ डिजिटल टीम

सुप्रिम कोर्टाने निलंबनाची कारवाई मागे घेतली नसल्यानं आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार

महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असताना शिवसेना नेते अनिल देसाई यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. देसाई यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड फसणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. (maharashtra politics) दरम्यान, गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार आमच्या नेतृत्त्वासोबत संपर्कात आहेत, असं खळबळजनक वक्तव्य देसाईंनी केले आहे. त्यामुळे उर्रवरित दोन नेते सेनेच्या संपर्कात आहेत का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेचे तब्बल ४० आमदार असले तरी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केवळ ३८ आमदारांचा उल्लेखच करण्यात आला होता. त्यामुळे हॉटेलमध्ये असलेले दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. सर्व आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाची कारवाई मागे घेतलेली नाही. याचा फैसला आता ११ जुलैला होणार आहे.

यावर देसाईंनी सांगितले आहे की, कोणत्याही गोष्टी करायचा प्रयत्न झाल्यास मज्जाव करण्यात येईल. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. याच्या जोडीला गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार आमच्या नेतृत्त्वासोबत संपर्कात आहेत. त्यांचं म्हणणं ठाम आहे की, आम्ही मुंबईत किंवा विधानसभेत मतदानाला आल्यास शिवसेनेचे समर्थन करू. त्यामुळे देसाई यांचा हा दावा खरा ठरल्यास एकनाथ शिंदे यांचे बंड पूर्णपणे फसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर हा धोका टाळण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांना रसद पुरवणाऱ्या 'महाशक्ती'कडून काय पावले उचलली जातात, हे पाहावे लागणार आहे. एकनाथ शिंदे हे गुवाहाटी येथे गेल्यापासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेते आमदारांच्या आकड्यांचा दावा करत आहेत. आता देसाईंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला असून काय होणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र ११ जुलैपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT