anil parab criticism on ravi rana Esakal
महाराष्ट्र बातम्या

सेना सत्तेत असली तरी, शिवसैनिक मवाळ झालेला नाही; अनिल परब

राणा वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मातोश्री हे शिवसैनिकांसाठी मंदीर आहे. त्याला हात लावल्यास शिवसैनिक अंगावर येणार हे नक्की. आम्ही महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण होऊ देणार नाही. राणा सध्या दुसऱ्यांचं स्क्रिप्ट वाचत आहेत. शिवसेना सत्तेत असली तरी शिवसैनिक मवाळ झालेला नाही असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला. हिंदुत्वाचा पुरस्कार करत असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी, असं आव्हान आमदार रवी राणा यांनी काल दिलं होत. या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. आज सकाळी शिवसैनिक मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी रवी राणा (Ravi Rana) यांची टीका केली आहे.

रवी राणा यांच्यावर टीका करताना परब म्हणाले, हल्ली कोणीही उठतं आणि मातोश्रीवर येण्याचं आव्हान देतं. शिवसैनिक मजबूत आहेत. राणा कुटुंबीय अद्याप मातोश्रीला आव्हान देण्याबाबत छोटे आहेत. हिम्मत असेल तर त्यांनी मातोश्रीवर येऊन दाखवावं असा इशारा त्यांनी दिला.

हनुमान जयंतीच्या दिवशी येणार राणा दांपत्य मातोश्रीवर येणार होते. आम्ही त्यांना वेळही दिली होती. मात्र सांगितलेली वेळ त्यांच्या सोयीची नसेल, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार या, आम्ही तुमचं स्वागत करू असे आव्हानही परबांनी दिले. पुढे ते म्हणाले, सेनेला आव्हान देणं हे काही राणांचं काम नाही. राणा वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. मातोश्री हे शिवसैनिकांसाठी मंदीर आहे.त्याला हात लागल्यास शिवसैनिक अंगावर येणार हे नक्की. शिवसेना सत्तेत असली तरी शिवसैनिक मवाळ झालेला नाही अशा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT