anil parab anil parab
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारला संप मिटवण्यात अपयश; परबांचे मोठे विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तीन महिने उलटले आहे. यामुळे गरीब नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी शुक्रवारी (ता. २५) विधानसभेत मान्य केले आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी २६ ऑक्टोबरपासून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यातील विविध भागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि एसटीचा संप सुरू झाला. त्यांच्या आंदोलनाला तीन महिने होत झाले आहेत. मात्र, संप काही सुटलेला नाही.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित करण्यापासून अनेक कठोर निर्णय राज्य सरकारने घेतले तरीही संप सुटत नसल्याचे दिसत आहे. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यात अपयश आले आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विधानसभेत मान्य केले आहे.

...तरीही संप सुटत नाही आहे

माझ्यासमोरील मागण्या मान्य केल्यानंतरही मला युनियनची दुसरी नोटीस आली आहे. गरीब नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मी कोर्टात गेलो होतो. कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्यास सांगितले. दोन वर्षे कोरोनामुळे बोनस दिला नव्हता. यंदा बोनस देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांचे निलंबनही मागे घेण्यास तयार झालो. तरीही संप सुटत नाही आहे. तसेच कोर्टाच्या आदेशानंतरही डेपो बंद होत गेले, असे घटनाक्रम सांगताना अनिल परब (Anil Parab) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 30 जूनपूर्वी 'हे' काम न केल्यास पुढील 2,000 रुपयांचा हप्ता अडकणार; कृषी विभागाचा इशारा

Fan Cooling Tips : सीलिंग फॅनची स्पीड कमी झालीये? नवीन पंखा विकत घेण्यापूर्वी करून बघा 'हे' काम, येईल एसीसारखी थंड हवा

FIFA WORLD CUP 2026: मृत्यूला हरवून 'तो' मैदानावर उतरला; वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल करताच ढसाढसा रडला... कोण आहे Raúl Jiménez?

Latest Marathi News Live Update : काँग्रेस बुडणारं जहाज, विलिनीकरण झालं तरी आम्हालाच फायदा होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

आता IRCTC वेबसाईट हँग होणार नाही! १५ जुलैपासून नवी प्रणाली लागू; तत्काळ तिकीट बुकिंगचा त्रास संपणार?

SCROLL FOR NEXT