महाराष्ट्र बातम्या

कोरोनाचा कहर : कांताबाईंची कन्या अनिता, नातू बबलूचेही निधन

अशोक निंबाळकर

आधी कांताबाई सातारकर आणि आता मुलगी अनिता व नातू बबलूलाही देवाज्ञा

अहमदनगर ः तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागील आठवड्यात कांताबाई यांना देवाज्ञा झाली होती. मुलगी आणि नातवाच्या निधनाने संपूर्ण सातारकर-खेडकर कुटुंब दुःखात बुडाले आहे. संगमनेरसह संपूर्ण महाराष्ट्रालाही ही चुरका लावणारी घटना आहे.

25 तारखेला कांताबाई यांचे निधन झाले. मात्र, त्या जाण्याअगोदरच त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई कोरोनाने गेल्या होत्या. त्यावेळी कुटुंबातले सर्वच सदस्य दवाखान्यात दाखल असल्याने, विशेषतः रघुभाऊसारख्या हळव्या मनाच्या माणसाला हे दुःख सहन होईल का? बेबीताईंचा दवाखान्यात दाखल असलेला मुलगा बबलू हे सहन करू शकेल का? या सगळ्याचा विचार करून बेबीताई गेल्याची बातमी दडवली होती. मागील आठवड्यात बबलूला नाशिकला हलवलं होतं. अखेर त्यालाही मृत्यूने गाठलेच.(Anita and Bablu Khedkar passed away)

कांताबाईंना मिळाली मुलगी अनिताची साथ

कांताबाई सातारकर व तुकाराम खेडकर या दोन महान कलाकारांची ज्येष्ठ कन्या म्हणजे अनिताताई उर्फ बेबीताई.

१९६४ मध्ये तुकाराम खेडकर गेले. कांताबाईंनी मुलांसह तमाशा फड सोडला. तेव्हा बेबीताई अवघ्या ८-९ वर्षाच्या होत्या. १९६९ पर्यंत अनिताताई नृत्यात, अभिनयात, गाण्यात पारंगत झाल्या. १३-१४ वर्षे वयाची ही छोटी मुलगी दिवसरात्र कष्ट करीत होती. रायगडची राणी अर्थात पन्हाळगडाचा नजर कैदी हे वगनाट्य कोणत्याही कलाकारांसाठी मोठे आव्हान असायचे. यात अनिता खेडकर यांनी नकारात्मक छटा असलेली सोयराबाई यांची भूमिका साकारली.

बबलूही होता उत्तम कलाकार

कांताबाई मुलगी व नातवासह एकाच कुटुंबात संगमनेरला राहत होते. बबलू ऊर्फ अभिजीतला (वय ३८) आजी कांताबाई गेल्याचे दोन दिवसांपूर्वी समजले. रूग्णालयात त्याच्याकडे मोबाईल असल्याने सोशल मीडियातून त्याला हे कळाले. परंतु आई अनिता दीपक मैंडगी (वय ६५) यांचे निधन २१ मे रोजी झाले होते. ते बबलूपासून लपवून ठेवले होते. ते त्याला शेवटपर्यंत कळू दिले नाही. अभिजीतच्या पश्चात पत्नी अमृता व अडीच वर्षांची मुलगी आहे. बबलूचे निधन काल सायंकाळी नाशिकमधील खासगी हॉस्पिटलमध्ये झाले. बबलू उत्तम गायक, अभिनेता, वादक आणि तंत्रज्ञ होता. तमाशातील ध्वनी व प्रकाश योजना तो सांभाळत होता. त्याच्यावर आज (बुधवारी) सकाळी अकरा वाजता संगमनेर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती सकाळचे संगमनेरचे प्रतिनिधी आनंद गायकवाड यांनी दिली.

राजीव गांधीवरील वगनाट्यातही घडला स्फोट

डोम्या नाग, कोर्टादारी फुटला चुडा, सोयगाव हत्याकांड, पाच तोफांची सलामी, गवळ्याची रंभा, सख्खा भाऊ पक्का वैरी अशा असंख्य वगनाट्यातुन त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले. राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर आलेले ' हार फुलांचा फास मृत्यूचा ' या वगात एका दक्षिणात्य महिलेचे पात्र साकारताना तिथले हेल काढून बोलणे हे मोठे आव्हान होते. याच वगनाट्यावेळी नांदेडजवळ माळेगावच्या यात्रेत वगात वापरायच्या आपटबारचा स्फोट झाला. त्या स्फोटात एक सोंगाड्या जागीच ठार झाला. बबलू तेव्हा दोन वर्षांचा होता, तोही जबर जखमी झाला. परंतु आई कांताबाईंना मुलाला घेऊन हॉस्पिटलला पाठवले आणि अनिता रसिकांच्या मनोरंजनासाठी तेथेच थांबल्या. 'सुडाने पेटली फुलन ' या वगातली सीआयडी सीता आजही लोकांना आठवते. चार्ली चॅप्लीनचीही भूमिका भारीच वठवायच्या, त्यांचे निकटवर्तीय संतोष खेडलेकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही भावना व्यक्त केली आहे.(Anita and Bablu Khedkar passed away)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT