Anjali Damania strongly responds to MLA Amol Mitkari over his demand for an inquiry against IPS officer Anjana Krishna.
esakal
Anjali Damania slams Amol Mitkari over IPS Anjana Krishna inquiry demand : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस (DSP) म्हणून कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. याला कारण म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फोनवर झालेली त्यांची व्हायरल झालेली बातचीत. या फोनकॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार अंजना कृष्णा यांना दरडवाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे याप्रसंगी घटनास्थळी अजितदादांचे समर्थक कार्यकर्तेही हजर होते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पत्र पाठवून आयपीएस अंजना कृष्णा यांच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्याबाबत मागणी केली आहे. यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अमोल मिटकरींना बजावलं आहे, शिवाय राजकारण्यांवर जोरदार टीकाही केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठवलेले पत्र, एक्सवर पोस्ट करत अंजली दमानिया यांनी त्यांना खडेबोल सुनावत कडक इशाराही दिला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून मिटकरींवर संताप व्यक्त करत दमानिया म्हणाल्या, ‘’हा काय फालतूपणा आहे? अमोल मिटकरींनी त्यांच्या Boss च्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले, की स्वतःचे डोकं वापरले? अंजना कृष्णाची चौकशी? का? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून?’’
तसेच ‘’चौकशी त्या अजित पवारची झाली पाहिजे. ज्या कंपन्यांनमधे अजित पवारच्या कब्ज्यात आहेत त्याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत, ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील, त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत.’’ असं दमानियांनी म्हटलंय.
याशिवाय, ‘’त्या IPS ऑफिसर ना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन.IPS ऑफिसर्स च्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे.’’ अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी इशारा देत संताप व्यक्त केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.