KP Gosavi
KP Gosavi Sakal
महाराष्ट्र

Aryan Khan Case : किरण गोसावी पोलिसांना येणार शरण पण...

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कॅडेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीदरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासोबत सेल्फी घेणारा आणि पुणे पोलिसांपासून फरार असलेला आरोपी के. पी. गोसावी अर्थात किरण गोसावी पोलिसांना शरण येणार आहे, खुद्द त्यानंच साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली. पण आपण पुणे पोलिसांना किंवा महाराष्ट्रातील पोलिसांना शरण येणार नसून महाराष्ट्राबाहेर शरण येईल असंही त्यानं स्पष्ट केलं आहे.

गोसावी म्हणाला, माझ्यावर झालेले आरोप मला मान्य नाहीत. पैशांची देवाण-घेणाव झाल्याचं ज्यांनी सांगितलं त्यांनाच तुम्ही याबाबत विचारावं. २ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता मी समीर वानखेडे यांना समोरासमोर भेटलो. तोपर्यंत मी त्यांना ओळखत नव्हतो. याबाबत मी वारंवार पोलिसांना भेटू प्रत्यक्ष गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी एनसीबीच्या कोणत्याही कारवाईत पंच म्हणून हजर नव्हतो. पण पोलिसांच्या इतर कारवायांमध्ये मी पंच म्हणून होतो. यामध्ये गोमांसाच्या गाड्या पकडण्यामध्ये मी पोलिसांसोबत सामील होतो. ठाण्यात आम्ही अशा कारवाया केलेल्या आहेत.

प्रभाकर साईल यांच्या आरोपांना उत्तर देताना गोसावी म्हणाला, तो यापूर्वी माझ्यासोबत काम करत होता पण गेल्या बारा-तेरा दिवसांपासून तो दुसऱ्याच ठिकाणी आहे. त्याने माझ्यावर आरोप केल्याचं मला काल संध्याकाळी बातम्यांमधूनच कळालं. त्यामुळं मी आज स्वतः सरेंडर होण्याचा निर्णय घेतला कारण मलाही ६ तारखेपर्यंत भरपूर धमक्या आल्या. या धमक्यांमुळं मी काही काळ लपून राहिलो होतो.

६ तारखेला मी पोलिसांसमोर माझ्या वकिलांसोबत हजर होण्यासाठी जात होतो. तेव्हा मला फोन आला की पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे आमचीच चालते. तुझा मर्डर होईल आणि आणखी काही होईन. मी याबाबत तक्रार करणारच होतो पण मला त्याधाची आरोपी घोषीत करुन टाकलं. अशा वेळेला मी कोणालाही तक्रार देण्यासाठी फोन केला असता तर ती व्यक्ती अडचणीत आली असती, असंही गोसावी यानं सांगितलं.

कुठल्याही पक्षाशी संबंध नाही - गोसावी

माझ्या कुठल्याही पक्षाशी संबंध नाही. मी भाजपशी संबंधीत असल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आरोप आहेत. मी पुण्यातल्या फरासखाना पोलिसांना शरण येणार नाही, कारण मला पुण्यातूनच धमक्यांचे फोन आले होते. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या बाहेर मी स्वतः शरण येणार आहे. तपासात सर्वकाही समोर येईलच. देशासाठी माझं जे कर्तव्य होतं ते मी केलं. पुणे पोलिसांनी माझ्यावर तीन वर्षांनी फरार म्हणून लावलेली केस चुकीची आहे, असा दावाही किरण गोसावीनं केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT