Shiv Sena leader Priyanka Chaturvedi
Shiv Sena leader Priyanka Chaturvedi esakal
महाराष्ट्र

आर्यन खानला क्लीन चिट; प्रियंका चतुर्वेदींनी साधला भाजपवर निशाणा, म्हणाल्या..

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं ड्रग्ज पार्टी प्रकरणात क्लीनचिट दिलीय.

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीनं कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cordelia Cruises Drug Party Case) क्लीनचिट दिलीय. आज एनसीबीनं न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. सहा हजार पानांचं हे आरोपपत्र आहे. यात आर्यनसह सहा जणांना क्लीनचिट देण्यात आलीय. या निकालानंतर शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सत्याचा विजय झाला असल्याचं म्हटलंय. त्यांनी ट्विटद्वारे भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

क्लीनचिटनंतर भाजप आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची खिल्ली उडवत शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Shiv Sena leader Priyanka Chaturvedi) म्हणाल्या, ही क्लीन चिट म्हणजे सिंघम, भाजपसाठी (BJP) काम करणारी मीडिया आणि केंद्रीय एजन्सींच्या (NCB) माध्यमातून महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठी चपराक आहे." हा सत्याचा विजय आहे. आता मी सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात सीबीआय क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याची वाट पाहत आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

दरम्यान, आर्यन खानला क्लीनचीट मिळताच प्रसारमाध्यमांनी याबाबत समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, समीर वानखेडे यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. आर्यन खान याला क्लीनचीट मिळाली यावर आपली प्रतिक्रिया काय? असा सवाल करताच 'सॉरी, सॉरी मला या प्रकणावर काहीही बोलयाचं नाही, मी सध्या एनसीबीमध्ये नाही, त्यामुळं जे काही विचारायचं असेल ते एनसीबीच्या अधिकाऱ्यांना विचारा’ असं वानखेडे यांनी म्हटलंय.

कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुराव्यांअभावी सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही, तर अन्य १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एनसीबीला हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ ही २९ मे रोजी संपणार होती आणि त्यापूर्वी एनसीबीनं आज आरोपपत्र दाखल केलं आहे. विशेष न्यायालयात एनसीबीनं आपलं अंतिम आरोपपत्र दाखल केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT