Ashadhi Ekadashi esakal
महाराष्ट्र बातम्या

महापूजेसाठी CM शिंदेंच्या नातेवाईकांची गर्दी, वारकऱ्यांची रांग थांबवली

आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली.

Ashadhi Ekadashi : हातात भगवी पताका, टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरमध्ये (Pandharpur) पोहोचले आहेत. आज रविवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. यंदा आषाढीला कोविड-19 नियमांचं बंधन नव्हतं. तब्बल दोन वर्षांनी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर वारकरी भावूक झाले.

दिल्ली दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री पुणेमार्गे पंढरपूरमध्ये पोहोचले. रात्री २ वाजता मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहातून विठ्ठल मंदिराकडे निघाले. पहाटे अडीच वाजता महापूजेला सुरुवात झाली. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते.

Eknath Shinde

महापूजेसाठी CM शिंदेंच्या नातेवाईकांची गर्दी, वारकऱ्यांची रांग थांबवली

आषाढी एकादशीची विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे मंदिरात पोहोचले. शिंदे यांच्यासह नातेवाईक आणि समर्थकांनीही गर्दी केल्याचं वृत्त असून त्यांच्या सेवेसाठी आंघोळीला जाणाऱ्या वारकऱ्यांची रांग काही वेळेसाठी थांबवण्यात आली होती. साम टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ चार टेम्पो ट्रॅव्हलरमधून नातेवाईक आणि समर्थक पोहोचले. यामुळं सेवेसाठी आंघोळीला जाणाऱ्या वारकऱ्यांची रांग थांबवली. यावरुन संतापलेल्या वारकरी आणि पोलिसांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं.

Ashadhi Ekadashi

दरम्यान, आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याची प्रथा आहे. आषाढीच्या महापूजेसाठी एकनाथ शिंदे दिल्ली दौरा आटपून शनिवारी रात्री पूणेमार्गे पंढरपूरमध्ये पोहोचले. रात्री २ वाजता मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहातून विठ्ठल मंदिराकडे निघाले. पहाटे अडीच वाजता महापूजेला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाल्यावर वारकऱ्यांनी दर्शन घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant यांचा प्लॅन उघड! सुप्रीम कोर्टात काहीतरी मोठं घडणार..नियम एकदम बदलले, नेमकं चाललंय काय?

Mangalwedha Nagarparishad Election : अखेर मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक नव्याने जाहीर; मतदान २० तर मतमोजणी २१ डिसेंबरला

Kalamb News : पतसंस्थेच्या स्वच्छतागृहात महिलेने घेतला गळफास; कारण अस्पष्ट

Pune Airport : मर्यादित उड्डाणे तरीही पुणे विमानतळ ‘टॉप-20’मध्ये; आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये देशात 19 वे स्थान

56 वर्षांत मराठी चित्रपटाने ‘इफ्फी’मध्ये प्रथमच मारली बाजी; ‘गोंधळ’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

SCROLL FOR NEXT