Ashish Shelar Uddhav Thackeray
Ashish Shelar Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र

भाजपचा वेगळा पॅटर्न, आशिष शेलार तातडीने दिल्लीला रवाना

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. सध्या मविआ आणि भाजपचे सर्व आमदार विविध ठिकाणी रिसॉर्ट्सवर दाखल झाले आहेत. एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत आहेत. मात्र, यादरम्यान भाजपने वेगळी खेळी खेळायला सुरुवात केली आहे. (Rajyasabha Election 2022)

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याने त्यांच्या फिरण्यावर बंधनं आल्याने भाजपच्या वतीने प्रसाद लाड यांना मुंबईतील आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गिरीष महाजन यांच्यावर उर्वरित राज्यातील आमदारांना गळाला लावण्याची जबाबदारी आहे. महाजन यांनी तत्काळ पालघरच्या हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपसाठी संकटमोचन होण्याचं काम ते करत आहेत. (Ashish Shelar leaves for Delhi)

दरम्यान, आशिष शेलार तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

राज्यसभा आणि विधानपरिषद...सगळी सूत्र दिल्लीतून हालणार?

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर दिली आहे. ते लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. काँग्रेसतर्फे राहूल गांधी यांच्या जवळचे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने थेट मल्लिकार्जून खरगे आज मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपकडून राज्यसभेसोबतच २०जूनला पार पडणाऱ्या विधानपरिषदेसाठी तयारी सुरू झाली आहे. यासाठी अशिष शेलार दिल्लीत वरिष्ठांसोबत खलबतं करणार आहेत.

राज्यातील एकूण दहा जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे पाच सदस्य निवृत्त होत आहेत. सध्या भाजपकडे चार सदस्य पुन्हा निवडून देण्याची मतं आहेत. मात्र याठिकाणी देखील पाचवा उमेदवारावार भाजप दावा करत असल्याने परिषदेसाठी पुन्हा चुरस वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

SCROLL FOR NEXT