Sandeep Deshpande Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sandeep Deshpande: 'उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यासाठी संदीप देशपांडेंवर हल्ला'

अशोक खरातने हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख

अंकिता खाणे (Ankita Khane)

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपुर्वी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर अशोक खरात यांनी हल्ला केल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्यालंतर उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल असा आरोपी खरात याला विश्वास वाटत होता अशी धक्कादायक बाब जबाबामध्ये उघड झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.

उद्धव ठाकरे परत सत्तेत आल्यास आपल्याला बक्षीस देतील म्हणून महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेने निलेश पराडकरला फरार आरोपी दाखवलं आहे. या हल्ल्यात अद्याप तरी राजकीय अँगल नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. निलेश पराडकरचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना 3 मार्च रोजा चार अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही व्यक्तींनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता.

संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची माहीती आरोपींना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT