Aurangabad Osmanabad name change Google esakal
महाराष्ट्र बातम्या

Google Map : औरंगाबाद की संभाजीनगर?; तीव्र विरोधानंतर गुगलची माघार

गुगलनं काही दिवसांसाठी हे नाव का बदललं होतं, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गुगलनं काही दिवसांसाठी हे नाव का बदललं होतं, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

औरंगाबाद : इंटरनेटचे आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’वर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Sambhajinagar) झाल्याचं दिसतं होतं, त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं होतं. मात्र, आता विरोधानंतर गुगलनं माघार घेतल्याचं दिसतंय. गुगल मॅपनं तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद (Osmanabad) शहराचं नाव बदललं होतं. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारनं (Central Government) मान्यता न देताही गुगल मॅपनं (Google Map) नावात बदल केल्यानं नवा वाद निर्माण झाला होता.

गुगल मॅपमध्ये औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव (Dharashiv) असं केलं होतं. आता मॅपवर औरंगाबाद असं शोधल्यानंतर संभाजीनगर असा आपोआप रिझल्ट येत होता. मात्र, आता गुगलनं यु-टर्न घेतला असून पुन्हा संभाजीनगर काढून औरंगाबाद (Aurangabad) असं नाव कायम ठेवलंय, तर धाराशिवचं उस्मानाबाद केलंय.

गुगलनं काही दिवसांसाठी हे नाव का बदललं होतं आणि आता पुन्हा का बदल केला, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या मान्यतेआधीच गुगल मॅपनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव हे धाराशिव असा उल्लेख गुगल मॅपमध्ये केला होता. त्यामुळं औरंगाबादेत नव्या वादाला सुरूवात झाली होती. या गुगल मॅपच्या निर्णयाला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत थेट गुगलला टॅग करत जाब विचारला होता. गुगलवर औरंगाबाद सर्च केलं तर आपोआप संभाजीनगर आणि उस्मानाबाद सर्च केलं तर धाराशिव असा रिझल्ट येत होता. त्यानंतर आता गुगलनं सदर निर्णय बदलला आहे. आता गुगल मॅपमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद असं नाव दाखवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT